अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराचवेळ झाला तरी अंकिता बाहेर आली नाही.

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. अंकिता सांगळे असं मृत मुलीचं नाव आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ती निराश होती. अंकिताच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आक्समिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. (study) अंकिताचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. नीट परीक्षेची ती दीर्घकाळापासून तयारी करत होती. अलीकडेच जाहीर झालेल्या निकालामध्ये तिला 166 गुण मिळाले होते. अंकिताला यापेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. कमी गुण मिळाल्यामुळे ती तणावाखाली होती. याच मानसिक दबावामध्ये तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराचवेळ झाला तरी अंकिता बाहेर आली नाही. म्हणून कुटुंबियांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आतलं दृष्य पाहून सगळेच हादरले. अंकिताने जीवन संपवून घेतलेलं. लगेचच पोलिसांना या बद्दल कळवण्यात आलं.
अंकिताने तिच्यामागे एक चिठ्ठी सोडली आहे. (study) त्यात तिने लिहिलेलं की, “तुम्ही मला इतकं प्रेम दिलं. पण मी तुमची एकही इच्छा पूर्ण करु शकली नाही. आई तू तर प्रत्येक अडचणीत मैत्रीण बनून माझी साथ दिलीस. दादा तू सुद्धा मला साथ दिलीस. माझ्या जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. तुम्ही मला जो आनंद दिला, तो मी कधीच विसरु शकत नाही” “दादा तू आई-बाबांची काळजी घे. त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. तू सुद्धा आनंदी राहा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी तुम्हाला कुठला आनंद देऊ शकले नाही. मी आधी जेव्हा नीटचा अभ्यास करत होती, त्यावेळी तुम्ही त्याग केलात आणि मी काय केलं, तुमची इच्छा मी पूर्ण करु शकले नाही. आनंदी रहा. तुमची अंकिता” असं अंकिताने चिठ्ठीत लिहिलं आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे.
लंके यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरलं शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी अंकिताच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. (study) त्यांचं सांत्वन केलं. लंके यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरलं आहे. नीट परीक्षेची संबंधित वाद आणि पेपर लीकची निष्पक्ष चौकशी वेळेत पूर्ण झाली असती तर कदाचित अशा घटना टळल्या असत्या असं निलेश लंके म्हणाले.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?