सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत महसूल व वन विभागातील 1,539 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा समावेश केला आहे. (government) त्यामुळे एकूण रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, अर्ज करण्यासाठीची मुदतही वाढविण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये महसूल व वन विभागातील तलाठी पदाच्या तब्बल 1,539 रिक्त जागांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या पदांमुळे गट-क भरतीतील एकूण रिक्त पदांची संख्या आता 5,707 वर पोहोचली आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, वाढत्या प्रतिसादाचा विचार करून आयोगाने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढही जाहीर केली आहे.
तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा निश्चित करताना 5 ऑगस्ट 2026 ही दिनांक ग्राह्य धरण्यात येणार आहे. या भरतीमध्ये तलाठी पदांव्यतिरिक्त नागरी पुरवठा, अन्न व ग्राहक संरक्षण, आदिवासी विकास तसेच महसूल व वन विभागातील लिपिक-टंकलेखकाची 1,194 पदे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) पदाच्या 254 जागा, (government) तसेच वरिष्ठ अभिलेखपाल, वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक यांची प्रत्येकी 11 पदेही भरली जाणार आहेत. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी B.F.Sc. पदवी आवश्यक आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क 8 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन भरता येणार असून, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI या माध्यमातूनच शुल्क स्वीकारले जाईल. (government) बँक चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी OMR आधारित ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?