कॉकरोच जनता पार्टीने गेल्या काही दिवसात आपली ताकद दाखवून दिली आहे. देशभरात आंदोलन उभं करून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दाखवला. पण आपलं अस्तित्व दाखवलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं राजकीय भविष्य काय? असा प्रश्न पडतो. कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष होऊ शकत नाही, असंही सांगितलं जात आहे. चला जाणून घेऊयात कारण…

कॉकरोच जनता पार्टीने अल्पावधीतच आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. (Dharmendra Pradhan) ज्या जेन झीला कॉकरोच म्हणून हिणवलं गेलं, त्या जेन झीने कॉकरोच जनता पार्टीच्या व्यासपीठावरून केंद्र सरकारला दणका दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. हाच मुद्दा पकडून कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवलं. अभिजीत दिपकेच्या नेतृत्वात 6 जून 2026 रोजी जंतरमंतरवर प्रत्यक्ष आंदोलनाला सुरूवात झाली. हे आंदोलन 37 दिवस चाललं. या दरम्यान 20 जुलैला आंदोलकांनी संसद चलो मोर्चा काढला आणि त्यात तणाव निर्माण झाला होता. यात विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर हा वणवा संपूर्ण देशात पेटला आणि सरकारला झुकावं लागलं. 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. आंदोलनाला यश मिळाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचं भविष्य काय? राजकीय पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
कॉकरोच जनता पार्टी हा काय मान्यता प्राप्त किंवा नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. मे 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान झालेल्या टिप्पणीनंतर कॉकरोच जनता पार्टी उदयास आली. सुरूवातीला एक प्रतिकात्मक आणि उपहासात्मक ऑनलाइन मोहीम म्हणून याकडे पाहिलं गेलं. अभिजीत दिपके याने ही मोहिम सुरू केली होती. पण रातोरात या एका व्यासपीठावर देशभरातील असंतुष्ट तरूण एकत्र आले. कॉकरोच जनता पार्टीचं सदस्य होण्यासाठी इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तरूणांची रिघ लागली. तरूणांनी या व्यासपीठावरून मीम्स शेअर करून मनातील असंतोष व्यक्त केला. या माध्यमातून सत्ताधारी पक्षाविरोधात असंतुष्ट तरूणांना एक व्यासपीठच मिळालं. (Dharmendra Pradhan) त्यानंतर सोशल मीडियावरील ही संघटना मैदानात उतरली.
भारतात राजकीय पक्ष म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नवीन संघटनेला भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. पण कॉकरोच जनता पार्टीने अशी कोणतीही नोंदणी केलेली नाही. दुसरं नोंदणी केली तर निवडणूक आयोगाचे काही कठोर नियम आहेत. निवडणूक चिन्ह आदेश 1968 मध्ये कोणत्याही नवीन राजकीय पक्षाला कोणताही प्राणी किंवा पक्षी आपलं अधिकृत निवडणूक चिन्ह वापरण्यास सक्त मनाई आहे. कायद्यातील या कठोर तरतुदीमुळे कॉकरोच जनता पार्टीला झुरळ हे चिन्ह मिळणं अशक्य आहे. त्यामुळे भविष्यात कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक लढवण्यासाठी नोंदणी केली तर चिन्ह बदलणं भाग आहे.
कॉकरोच जनता पार्टीने जनआंदोलन उभं केलं आणि त्याला तरूणाईचा प्रचंड पाठिंबा लाभला. पण इतक्यावरच राजकीय पक्ष उभारता येत नाही. त्यासाठी संविधानाच्या चौकटीत उभं राहून काम करावं लागतं. व्यापक सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागते. पक्षाची घटना, पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागते. कॉकरोच जनता पार्टीचं तसं काही धोरण सध्यातरी दिसत नाही.(Dharmendra Pradhan) त्यामुळे पक्ष बांधणी करताना बऱ्याच अडचणी आहेत. इतकंच काय आर्थिक पारदर्शकताही महत्त्वाची आहे. बँक खात्याच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला नियमित अहवाल सादर करणे हा देखील प्रक्रियेचा भाग आहे. सध्या कॉकरोच जनता पार्टी या प्रक्रियेचा भाग नाही. फक्त डिजिजल माध्यमातून पक्ष उभा करणं सोपं नाही. त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम होणं आवश्यक आहे.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?