मीरा रोडच्या नया नगर परिसरात एका दुचाकीवर पाच शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासह शाळा परिसरात अधिक देखरेख आणि जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. मीरा रोडच्या नया नगर परिसरात वाहतूक नियमांचे पुन्हा एकदा सर्रास उल्लंघन होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुचाकीवर तब्बल पाच शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश परिधान केलेले अल्पवयीन विद्यार्थी एका दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक संख्येने बसून प्रवास करताना दिसत आहेत. अशा प्रकारे दुचाकीवर अतिरिक्त प्रवासी घेऊन प्रवास करणे हे मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर वाहतूक नियमांचे उल्लंघन मानले जाते. (travelling) यामुळे अपघाताचा धोका अनेकपटीने वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होतो.यापूर्वीही मीरा रोडमधील सेव्हन इलेव्हन शाळेसमोर अशाच प्रकारचा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळी वाहतूक विभागाने संबंधितांवर कारवाई केली होती. मात्र, अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने वाहतूक विभागाच्या कारवाईची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी शाळांच्या परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी तसेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे. शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांना वेळोवेळी सूचना देऊन नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.वारंवार घडणाऱ्या (travelling) अशा घटनांमुळे मीरा-भाईंदर शहरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी वाहतूक विभाग, शाळा प्रशासन आणि पालक यांनी समन्वयाने काम करून अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच मीरा रोड परिसरात बेव्हर्ली पार्क परिसरातील ए.एन.के. लक्झरी सलून अँड स्पा येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात स्पाच्या आड कथित देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून, (travelling) या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या स्पामध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये कथित देहव्यापार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पाच तरुणींना सुरक्षित ताब्यात घेत त्यांची सुटका केली.
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?
बदली, मानधनी १,१९८ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर?