पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. सरकारविरोधात लोकांचा रोष प्रचंड वाढला.(Kashmir) लोक रस्त्यावर उतरत आहेत. यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पाकव्यात काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यानचे काही व्हिडीओ पुढे आलीत. वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. वाढती महागाई, विजेचे वाढलेले भाव याविरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, पाकिस्तानी लष्कराने नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 40 जणांचा मृत्यू झाला तर हजारोच्या घरात नागरिक गंभीर जखमी झालेत.

यानंतर पाकिस्तानी लष्कराने या भागातील इंटरनेट सेवाही बंद केली. लोकांमध्ये सरकाविरोधात मोठा संताप बघायला मिळतो. त्यामध्येच आता थेट गोळीबार करण्यात आल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. लोक सरकारविरोधात उठाव करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. लोकांवर सरकारकडून गोळीबार केला जातोय.
पूर्ण इंटरनेट सेवा ठप्प आहे. वीज पुरवठा खंडीत आहे. मात्र, ज्यावेळी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळीचे हादरवणारे व्हिडीओ पुढे आले. प्रचंड असा अत्याचार लोकांवर पाकव्याप्त(Kashmir) काश्मीरमध्ये होताना दिसत आहे. लोक अनेक मागण्या करत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे सोडून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहेत. लष्कराकडून सतत गोळीबार पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सध्याची परिस्थिती सरकारसाठीही डोकेदुखी ठरत आहे. लोकांनी मोठा उठाव केला.
त्यामध्येच द न्यूयॉर्क टाइम्सने पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख पाकिस्तानी काश्मीर असा केल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की, ही शब्दावली दिशाभूल करणारी आणि चुकीची आहे.(Kashmir) पाकिस्तानी काश्मीर नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नाही. तो फक्त पाकव्याप्त काश्मीर आहे. पाकिस्तानी काश्मीर नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर जो छळ होत आहे, तो लपून ठेवण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केली जात आहेत.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?