कोल्हापुरात मुसळधार राधानगरी धरण 97 टक्के भरले, स्वयंचलित दरवाजे कधीही उघडणार पंचगंगा इशारा पातळीकडे?

जिल्ह्यातील नऊ धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस पडला. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण क्षेत्रात २४ तासांत २१४ मिमी. पाऊस झाला. या पावसाळ्यातील अतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. (​​Gaganbawda) त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून, रात्री १० वाजता पाणीपातळी ३२ फूट १० इंच होती.

चित्री, जंगमहट्टी प्रकल्प शंभर टक्के भरले असून, तेथून विसर्गही सुरू आहे. राधानगरी धरण ९७ टक्के भरले असून, कधीही धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. शहरालगत असणाऱ्या बापट कँम्प वीटभट्टीपर्यंत पुराचे पाणी आले आहे. (​​Gaganbawda) रस्त्याकडेला असणाऱ्या विक्रेत्यांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील ३० बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरण क्षेत्रात ९७ मिमी., तुळशी धरण क्षेत्रात ८६ मिमी., कासारी धरण क्षेत्रात ७७ मिमी., कुंभी धरण क्षेत्रात ७० मिमी. पावसाची नोंद झाली. पाटगाव धरण क्षेत्रात १२० मिमी., तर चिकोत्रा धरण क्षेत्रात ९० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जांबरे धरण क्षेत्रातही ८५ टक्के पाऊस झाला आहे. काल सकाळी ८ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट २ इंच होती. बारा तासांत पाणी पातळी अडीच फुटांनी वाढली आहे.

शहर आणि परिसरातही पावसाची संततधार सुरू होती. सकाळी सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही पावसाची रिपरिप सुरूच होती.(​​Gaganbawda) त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणात ८.१९ टीएमसी पाणीसाठा असून, धरण ९७ टक्के भरले आहे. धरणातून सध्या १४०० क्युसेक पाणी सोडले जात असून, स्वयंचलित दरवाजेही खुले होतील, अशी स्थिती आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?