दुष्काळाच्या अन्यायी निकषावरून कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या शेतकऱ्यांमधील असंतोषाचे पडसाद सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण उमटले. दुष्काळाच्या निकषामुळे जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखल बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासना केली. (meeting) त्यांच्या या वक्तव्याच्या आधारे या मागणीचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८७ वी सभा आज शांततेत पार पडली. बँकेची निवडणूक होऊ घातली असल्याने अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा डंका वाजवण्यावर भर दिला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवण्याची मागणी केली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांनी नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष राजू आवळे यांनी आभार मानले.
उसासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील उसाचे उत्पादन एकरी उत्पादन घटले असल्याबद्दल चिंता व्यक्त करून याचा परिणाम साखर उद्योगावर आणि पर्यायाने बँकांवर होत असल्याकडे लक्ष वेधले. (meeting) यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या आधारे ऊस उत्पादन वाढीसाठी व्यापक कार्यक्रम बँकेच्या वतीने राबवण्यात येत असल्याचे सांगत त्यासाठी एक योजना जाहीर केली. या अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा केला जाणार आहे. याद्वारे जिल्ह्यातील ऊस उत्पादन वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला अपात्र कर्जमाफीतील ११२ कोटीच्या प्रकरणाचा उल्लेख करून मुश्रीफ यांनी हे जुने दुखणे यावर्षी निश्चितपणे संपुष्टात आणले जाईल, असे आश्वस्त केले.
भाषणाची सांगता करताना बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी गोकुळ निवडणुकीच्या घाई गडबडीत वेळ काढून सतेज पाटील हजर राहिल्याबद्दल आभार मानत असल्याचा चिमटा काढला. (meeting) त्यावर सतेज पाटील यांनी आधी तुमच्यातील मिटवा; मग आमच्याकडे पहा, असा टोला लगावला. महाडिक, गोकुळ अन् सभा दरम्यान बँकेचे सर्व संचालक उपस्थित असले तरी आमदार अमल महाडिक यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती. काल गोकुळच्या ठरावावरून राष्ट्रवादी – भाजपमध्ये घडलेल्या वादाचे हे पडसाद आहेत का, अशीही कुजबुज सभास्थळी सुरू होती. बँकेचे अध्यक्ष म्हणून पाच वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. बँकेची धवल प्रगती करता आली. आता बँकेची निवडणूक होणार आहे. पण पुढे काय होईल सांगता येत नाही, असा उल्लेख अध्यक्ष मुश्रीफ यांनी केला. बँकेच्या संचालक मंडळात सलग दहा वर्षे असणाऱ्यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास रिझर्व बँकेने निर्बंध घातले असल्याचा यामागे संदर्भ होता अशी चर्चा सुरू होती.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?