आता सांगूनच टाकतो अमिताभ बच्चन यांचं एक ट्विट, मोठी खळबळ?

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन सध्या एका ट्विटमुळे वादात सापडले आहेत. या(Bollywood) ट्विटमुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी असं काही ट्विट केलंय की उच्चशिक्षित लोकही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या फीफा वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. या फुटबॉल वर्ल्डकपवर त्यांनी एक ट्विट करून वादाला अंगाला लावून घेतला आहे. या ट्विटमुळे अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.फ्रान्सच्या फुटबॉल टीमने पराग्वेला पराभूत करून फीफा विश्व कपच्या पुढच्या भागात स्थान मिळवलं आहे. फ्रान्सच्या या विजयावर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांनी 6 जुलै 2026 रोजी हे ट्विट केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये मनातील भावना स्पष्ट केली आहे. आता सांगूनच टाकतो.(Bollywood) वर्ल्ड कप 2026ची फ्रान्सची फुटबॉल टीम पाहा. द फ्रेंच. टीममध्ये 11 खेळाडू आहेत. 10 ब्लॅक आहेत आणि एक व्हाईट आहे. हीच ब्लॅकची ताकद आहे, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.अमिताभ यांच्या ट्विटवर लोक चंगलेच भडकले आहे. नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फ्रान्सची टीम त्यांच्या रंगाने नव्हे तर त्यांच्या राष्ट्रीयतेने ओळखली जाते, अशा शब्दात नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना फटकारलं आहे. तर काही लोकांनी अवाजवी आणि असंवेदनशील ट्विट म्हणून अमिताभ यांना फटकारलं आहे.

नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फ्रान्स हा एक बहुसांस्कृतिक देश आहे(Bollywood). टीममध्ये काही खेळाडू आफ्रिकी आहेत. तर काही कैरेबियाई वंशाचे आहेत. पण त्यांचा जन्म आणि पालनपोषण हे फ्रान्समध्ये झालं आहे. त्यामुळे त्यांना रंगभेदातून पाहू नये. तर त्यांना केवळ आणि केवळ फ्रान्सचे खेळाडू म्हणूनच पाहा, असं एकाने म्हटलं आहे. तर, काही यूजर्सने त्यांना पाठिंबा दिला आहे. बिग बींच्या ट्विटचा अर्थ चुकीचा काढू नये, असं काही लोकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय?

शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो सावधान? तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?