इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांविषयी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या नगरसेविकांची तक्रार आयुक्तांना समज देणार?

इचलकरंजी महापालिकेतील भाजपमधील अंतर्गत वाद आता थेट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचला आहे. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान (Ichalkaranji) भाजपच्या नगरसेविकांनी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कथित अवमानकारक वागणुकीबाबत मंत्री पाटील यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.

नगरसेविकांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. आयुक्तांकडून लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना गटबाजी टाळून सामंजस्याने काम करण्याचा सल्ला दिला. (Ichalkaranji) तसेच, आयुक्त पल्लवी पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून त्यांना समज दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीनंतर इचलकरंजी महापालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात या प्रकरणावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?