इचलकरंजीत बिअर न मिळाल्याने गोंधळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजीतील द ट्रॅव्हल्स इन या बिअर(beer)बारमध्ये मद्यप्राशनावरून वाद उफाळून शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, गावभाग पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, निलेश सुदेश मलके व त्यांच्या सोबत काहीजण रात्री ११.३० च्या सुमारास द ट्रॅव्हल्स इन बिअर बारमध्ये बसले होते. निलेशने अतिरिक्त बिअरची(beer) मागणी केल्यावर मॅनेजरने नकार दिला आणि सुहास लाटणे यांना बोलावून घेतले. त्यानंतर सुहास लाटणे यांनी निलेशला शिवीगाळ केली आणि त्यांच्या सोबतच्या गोविंद, चिंतामणी, ऋषीकेश, पुष्कराज आणि अभिमन्यू लाटणे या सहाजणांनी निलेशवर लाथाबुक्क्यांनी आणि प्लास्टिकच्या पाईपने हल्ला केल्याचा आरोप आहे.

दुसरीकडे, हॉटेल मॅनेजर अनिकेत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निलेश मलके यानेही गैरवर्तन केल्याचे सांगत त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे इचलकरंजीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा :

आता देशवासियांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे

पुढच्या वर्षीही IPL खेळणार? CSK च्या कर्णधाराचे हसत-हसत उत्तर

Malaika Aroraच्या अडचणी वाढणार? कोर्टाचा अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा इशारा