भिवंडी कोहिनर इमारत(Bhiwandi) दुर्घटना प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. भिवंडी शहरातील गंगारारामवाडी भागातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन जण जखमी आहेत. या प्रकरणी निझामपूर महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर इमारत मालक आणि दुरुस्ती कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पढील कारवाईला सुरुवात केली आहे.इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीचा मालक बिलाल अहमद अबुबकर खान यांच्यावर आवश्यक परवानग्या न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर या इमारतीचे खांब दुरुस्त करणारे कंत्राटदार अशोक यांच्यावरही आरोप करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १०५, १२५ अ ब आणि एमआरटीपी कायद्याच्या कलम ५२ आणि ५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू
भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग फैजल अब्दुल कय्यूम तातली यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.(Bhiwandi) तर गुरुवारी रात्री 11 वाजता घडलेल्या दुर्घटनेत क्रिस कुमार ४१, रणजीत सिंग ३२, मिराज रसूल शेख ३४, शमिम अन्सारी ३०, राकेश पासवान ३०, अशोक पासवान ४२, मुकेश पासवान, संतोष कुमार पांडे ४२,३५, श्यामजी मुरहू पाल ४८ आणि राधेश्याम कमलेश कुशवाहा ४६ यांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेत तिघे जखमी
अभय कुमार यादव २४, दीपक कुमार यादव २५ आणि संगीता प्रजापती ३६ हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आता धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकाम आणि महानगरपालिकेने त्यावर केलेल्या कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.(Bhiwandi) या प्रकरणी शांती नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. तत्पूर्वी, भिवंडीतील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच अतिधोकादायक इमारतीतबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकांना आदेश दिले आहे.
2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?
अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?