शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज केंद्र सरकारने योजनेत केली मुदतवाढ?

राज्यातील महायुती सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, (farmers) यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आगामी काळात आर्थिक मदत सुरूच राहणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची मुदत थेट 2030-31 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याच मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना यालाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पीएम-किसान योजनेचे लाभार्थी 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. (farmers) अशा वेळी केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पुढील काही वर्षे योजनेचा लाभ मिळत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या योजनेचा 24 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

सरकारी आकडेवारीनुसार, योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्त्यांद्वारे 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 23 व्या हप्त्याचा लाभ 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला असून, (farmers) या लाभार्थ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक चार लाभार्थ्यांमागे एका महिला शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होत राहणार आहे. 3.15 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याने योजनेची अंमलबजावणी अखंड सुरू राहणार असून, या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार आहे.

हेही वाचा :

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट?

आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त?