अमित शाह यांच्या भेटीला सुनेत्रा पवार, पुण्यात घडामोडींना वेग, काही वेळातच?

पुणे दाैऱ्यावर अमित शाह आहेत. अमित शाह यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्या आहेत. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यादरम्यान काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. भाजपा कार्यकर्तेही काँग्रेस भवनासमोर आंदोलन करत आहेत.

गृहमंत्री अमित शाह पुणे दाैऱ्यावर आहेत. रात्री उशीरा ते पुण्यात दाखल झाले. अमित शाह ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथे मोठा पोलिस बंदोबस्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पुण्यात आहेत. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली. (meets) त्यानंतर भाजपा कार्यकर्त्येही आक्रमक भूमिका घेत आहेत. काँग्रेस भवनासमोर मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्ये जमले असून त्यांच्याकडून आंदोलन केले जातंय. यादरम्यानच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अमित शाह यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. अमित शाहंची भेट सुनेत्रा पवार घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यादरम्यान उपस्थित असण्याचा अंदाज आहे. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यानंतर वातावरण अधिक चिघळताना दिसत आहे.

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात काँग्रेस आणि वंचितचे आंदोलन पेटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. यादरम्यान दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. (meets) त्यातच दोन्ही राष्ट्रपती एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यावरही अमित शाह आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याचा अंदाज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा हॉटेल रिट्ज बाहेर तैनात आहे. अमित शाह निघण्याच्या हालचाली सुरू आहेत. थोड्याच वेळात सारसबागेकडे ते निघू शकतात. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळत होती.

संजय राऊत यांनीही अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यावर टीका केली. (meets) संजय राऊत यांनी म्हटले की, गृहमंत्री अमित शाह अंधारात पुण्यात आले. ते देशाचे गृहमंत्री आहे, त्यांना कोणाची भीती आहे. अमित शाह संसदेत उपस्थित राहत नाहीत आणि पुण्यात येतात, असेही त्यांनी म्हटले. पुण्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त अमित शाह यांच्या दाैऱ्यादरम्यान ठेवला आहे. अमित शाह यांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतंय.

हेही वाचा :

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट?

आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त?