मध्यपूर्वेतील तणाव निवळल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट जागतिक बाजारासाठी दिलासादायक ठरली आहे. अमेरिकन आणि ‘ब्रेंट’ (Brent) कच्च्या तेलाच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. मात्र, भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत त्वरित घट होणार नाही, कारण त्या कर आणि चलन विनिमय दरांवर अवलंबून असतात. (oil prices) तरीही, यातून सामान्य जनतेला भविष्यात दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

बऱ्याच काळानंतर जगासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला इराणविरोधातील नवे हल्ले थांबवण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले. तसेच, मध्यपूर्वेतील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठीचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केला. मात्र, रविवारी रात्री अमेरिकन क्रूड तेलाच्या किमती संघर्ष सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत अजूनही सुमारे 20 टक्क्यांनी अधिक होत्या.
रविवारी रात्री अमेरिकन क्रूड तेलाची किंमत 5 टक्क्यांनी घसरून 80.79 डॉलर प्रति बॅरल झाली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मानक मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडची किंमतही 5 टक्क्यांनी घसरून 83.87 डॉलर प्रति बॅरलवर आली. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर जागतिक तेलबाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. वसंत ऋतूमध्ये अनेकदा कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या होत्या.गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे फारसच्या आखातातून तेलवाहू जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. संघर्ष संपल्यास अडकून पडलेले तेलवाहू टँकर पुन्हा मार्गस्थ होतील आणि जागतिक पुरवठा साखळीला मोठा दिलासा मिळेल. (oil prices) त्यामुळे जगाचं लक्ष आता इथेच एकवटलं आहे.
कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (ATF) यांच्या दरांवर झाला. परिणामी, वाहतूक खर्च वाढल्याने प्रवाशांना अधिक भाडं मोजावं लागलं. काही देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने रेशनिंग लागू करण्यात आलं, तर काही ठिकाणी शाळा आणि सरकारी कार्यालये तात्पुरती बंद ठेवावी लागली. एकंदरच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला, त्याचं बजेट कोलमडलं आणि खिशावर मोठा भार पडला.अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या संघर्षादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या. या परिस्थितीचा फायदा तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांना झाला असून, त्यांनी विक्रमी नफा कमावला.
कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर त्वरित कमी होतील, असं नसतं. यामागे ‘पास-थ्रू इफेक्ट’ हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजेच, कच्च्या तेलाच्या दरातील बदलाचा किती परिणाम किरकोळ इंधन दरांवर होतो, हे प्रत्येक देशाच्या धोरणांवर अवलंबून असते. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पूर्णपणे मुक्त बाजारावर आधारित नाहीत, तसेच त्या संपूर्णपणे सरकारी नियंत्रणाखालीही नाहीत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर, रुपया-डॉलर विनिमय दर, रिफायनिंगचा खर्च, वाहतूक खर्च आणि केंद्र-राज्य सरकारांचे कर या सर्व बाबींचा विचार करून तेल कंपन्या इंधनाचे दर निश्चित करतात. (oil prices) त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा किंवा घटीचा परिणाम किरकोळ दरांवर काहीसा उशिराने आणि मर्यादित प्रमाणात दिसून येतो.
हेही वाचा :
12 ऑगस्टला येणार नवी Bajaj Pulsar जाणून घ्या काय असेल खास?
शहरात दिवसभर दमदार तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी?
इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा?