अखेर प्रतीक्षा संपली दहावी बारावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक(Education) शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षांसाठी उपस्थित राहिले होते. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाच्या या तणावातून मुक्त झाले होते. परंतु, हा तणाव पुन्हा एकदा वाटेवर आला आहे कारण परीक्षेचा निकाल जाहीर जवळ आला आहे. विद्यार्थ्यांना असणारा या प्रतिक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. परीक्षेचा निकाल १५ मेपर्यंत लागण्याच्या दिशेवर आहे, असा निर्णय शिक्षण मंडळाने दिला आहे.

FDDI सहाय्यक व्यवस्थापक भरती 2025: अर्ज प्रक्रिया सुरू; कोणतेही शुल्क नाही
महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी हा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. बोर्डाकडून निकालाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पेपरची तपासणी अगदी शेवटच्या टप्यात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह (Education)तर आहेच त्याचबरोबर चिंतेचेही वातावरण आहे. मुळात, शरद गोसावी यांनी १५ मेपर्यंत निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही यंदाचा बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकरच लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती. मात्र, यंदा दोन्ही निकाल लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, मागील वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी तर दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यार आला होता. त्यानंतर यंदा मात्र,(Education) १५ मेच्या आत निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉलतिकीटवरील सीट नंबर आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सवर जावे लागेल. त्या वेबसाइट्स म्हणजे – mahahsscboard.in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, mh-ssc.ac.in, sscboardpune.in आणि sscresult.mkcl.org. या वेबसाइट्सवर जाऊन ‘Maharashtra SSC/HSC Result 2025’ लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन विंडोमध्ये आवश्यक माहिती भरून निकाल पाहता येईल आणि तो डाउनलोड करून साठवून ठेवता येईल.

हेही वाचा :

‘तारक मेहता’मधील अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

अक्षय्य तृतीयेपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरवाढीत ब्रेक

IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट