सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra) अर्ज प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या किंवा तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 होती. मात्र, अनेक उमेदवारांकडून आलेल्या मागण्या तसेच ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगाने अर्जासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता इच्छुक उमेदवारांना 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.अर्जासोबत भरावयाच्या परीक्षा शुल्कासाठीही आयोगाने स्वतंत्र मुदतवाढ जाहीर केली आहे. उमेदवारांना ऑनलाइन शुल्क 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत भरता येईल. यंदा गट-क संवर्गातील विविध शासकीय विभागांमधील तब्बल 5707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली तलाठी पदांची 1539 रिक्त पदे समाविष्ट आहेत. (Maharashtra) त्यामुळे सरकारी सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आयोगाने अर्जदारांना अर्जातील माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबत विशेष सूचना देखील दिल्या आहेत. अर्ज सादर केल्यानंतर काही तपशील अपूर्ण राहिले असल्यास किंवा आवश्यक माहिती अद्ययावत करायची असल्यास उमेदवारांनी mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘My Account’ विभागातून संबंधित परीक्षेसमोरील पर्याय निवडून आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत. अर्जात नमूद केलेल्या दाव्यांशी संबंधित सर्व अधिकृत प्रमाणपत्रे वेळेत सादर करणे बंधनकारक (Maharashtra) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, शेवटच्या दिवशी संकेतस्थळावर वाढणारा ताण लक्षात घेता अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया अखेरच्या क्षणापर्यंत पुढे ढकलू नये, असे आवाहन आयोगाने केले आहे. अधिक माहितीसाठी mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट देता येईल.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?