एसटीचा मोठा निर्णय ! कागदी पास बंद, आता विद्यार्थ्यांचा बस प्रवास होणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. (students) यापुढे पारंपरिक कागदी बस पास बंद करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सवलतीचा प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता येणार असून, डिजिटल व्यवस्थेला चालना मिळणार आहे. एसटी महामंडळाने सांगितले की, हे स्मार्ट कार्ड केवळ एसटी बसमध्येच नाही तर देशातील इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरता येईल. NCMC हे प्रीपेड डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थी एसटी बसमधील सवलतीचा लाभ घेऊ शकतील. शिवाय हे कार्ड मेट्रो, बेस्ट बस, काही रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरता येणार आहे. (students) एकाच कार्डाने विविध वाहतुकीचे सुलभ प्रवास शक्य होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही बहुउपयोगी सुविधा ठरणार आहे.एसटी महामंडळाने स्पष्ट केले की, NCMC कार्डची नोंदणी विद्यार्थ्यांच्या ‘सरल’ आयडी क्रमांकाशी जोडली जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि सवलतींचा गैरवापर रोखता येईल.

कार्ड मिळवण्याची प्रक्रिया काय
विद्यार्थ्यांना शाळा/महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र घेणे आवश्यक.
प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी पूर्ण होईल.
गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत एजंट थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन नोंदणी करतील.

खर्च किती NCMC स्मार्ट कार्डसाठी विद्यार्थ्यांना १९९ रुपये शुल्क भरावे लागेल. हे कार्ड प्रीपेड असल्याने भविष्यात इतर वाहतूक सेवांसाठीही त्याचा वापर करता येईल.एसटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, तातडीने बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. (students) यामुळे दरवर्षी बस पाससाठी लागणारी मोठी गर्दी आणि रांग टाळता येईल.विद्यार्थ्यांसाठी हे डिजिटल पाऊल अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आधुनिक प्रवास व्यवस्था निर्माण करतील. पारदर्शकतेच्या माध्यमातून सवलतीचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल.” असे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा