महिला आशिया कप 2026 स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (India-Pakistan) आशियाई क्रिकेट परिषद आयोजित ही स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून 13 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना 5 सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

यंदाची महिला आशिया कप स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाणार असून या स्पर्धेचे सहाव्यांदा आयोजन होत आहे. एकूण आठ संघ सहभागी होणार असून त्यांना प्रत्येकी चार संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. अ गटात भारत , पाकिस्तान , थायलंड आणि हाँगकाँग चीन यांचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका , बांगलादेश , यूएई आणि इंडोनेशिया हे संघ खेळणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथेच खेळवले जाणार आहेत. (India-Pakistan) स्थानिक वेळेनुसार प्रत्येक सामना सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. संपूर्ण स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार असून प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवतील.
स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरला भारतीय संघ हाँगकाँग चीनचा सामना करेल. सर्वाधिक उत्सुकता असलेली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 5 सप्टेंबर रोजी होणार असून या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. ग्रुप फेरीनंतर 10 आणि 11 सप्टेंबर रोजी उपांत्य सामने खेळवले जातील. (India-Pakistan) या दोन्ही सामन्यांतील विजेते संघ 13 सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत आमनेसामने येतील. गतविजेता श्रीलंका यंदाही विजेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. 2024 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेतील श्रीलंकेचा पहिला सामना 29 ऑगस्ट रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?