PM मोदी-शहांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरेंनी केलेला मोठा खुलासा काय?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. खासकरून दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याबाबत चर्चा सुरू आहे. (meeting) याच काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आज सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी आणि शहांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, संसदेच्या अधिवेशनात आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते. मात्र यावेळी तशी संधी मिळाली नाही. (meeting) त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेत राज्यातील जे प्रश्न आहेत, त्यासंबंधात संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली. या भेटीतून आपल्याला काय न्याय मिळतो का या हेतूने मी जवळपास 10 मंत्र्यांची भेट घेतली.

पुढे बोलताना तटकरे यांनी सांगितले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, ही सदिच्छा आणि मार्गदर्शन अशा प्रकारची भेट होती. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट ही सदिच्छा भेट होती. त्यानंतर प्रामुख्याने मुंबई-गोवा रस्त्याच्या संदर्भात जो प्रश्न कोकणवासियांना भेडसावत आहे त्याबाबत आणि त्या रस्त्यावर असलेला टोलनाक्यांबाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

नितीन गडकरींच्या भेटीवेळी असे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की, सरकारचं धोरण 60 किलोमीटरवर टोल असावा, मात्र कोकणात 40 किमीच्या अंतरावर टोल होत आहेत. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देत त्यांनी काही सूचना दिल्या आहेत (meeting) अशी माहिती यावेळी तटकरे यांनी दिली आहे. आता आगामी काळात गडकरी या रस्त्याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?