भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून खेळाडूंना दुखापतींने ग्रासल्याचं दिसत आहे. (Indian team) त्यामुळे टीम इंडियाचे फिजिओ आणि खेळाडू बीसीसीआयच्या रडारवर आले आहे. असं असताना हर्षित राणाबाबत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेसाठी रणनिती आखत आहे. पण असं असताना खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ बांधणी करणं कठीण होत आहे. (Indian team) याबाबत कर्णधार शुबमन गिलनेही परखड मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याने मोठी बातमी झाली. कारण फिटनेस टेस्ट पास करूनच मैदानात परतला होता. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीमुळे हर्षित राणा स्पर्धेला मुकला आणि त्यानंतर त्याने बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार घेतले. इंग्लंड दौऱ्यातील फिट होऊन परतला, पण तिसऱ्या टी20 सामन्यात दुखापत झाली आणि स्पर्धेतून आऊट झाला. आता हार्षित राणाबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. हर्षित राणा दुखापग्रस्त नव्हताचं असं सांगितलं जात आहे.
खराब फिटनेसममुळे गोलंदाजी करताना हर्षित राणाला वारंवार क्रँप येत होते. त्यामुळे त्याला बसवण्याशिवाय पर्याय नव्हता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हर्षित राणा ओवरवेट होता. वजन जास्त असल्याने अनफिट होता. सेंटर ऑफ एक्सीलेंसने त्याचं वजन 97 किलो असून त्याला फिट घोषित केलं होतं. खरं तर त्याचं वजन 96 किलोच्या वर नसायला हवं. रिपोर्टमधील दाव्यानुसार, संघ व्यवस्थापनाला हर्षित राणा संघात हवा होता, त्यामुळे त्याला घाई गडबडीत क्लीयरन्स दिलं गेलं. (Indian team) त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. बीसीसीआयने आता सर्व प्रकरण खोदून काढण्यास सुरूवात केली आहे.
हर्षित राणा प्रकरणानंतर बीसीसीआयचा संताप झाला आहे. इतकंच काय तर फिजिओ सक्त ताकीदही दिली आहे. कोणाचं ऐकू नका आणि सर्व खेळाडूंच्या फिटनेससाठी एकच मानक ठेवा. त्यामुळे श्रीलंका कसोटी मालिकेनंतर बरंच काही घडणार असं चित्र आहे. हर्षित राणाच नाही तर टीम इंडियातील इतर खेळाडूही दुखापतीने ग्रस्त आहेत. नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर दुखापत ग्रस्त आहेत.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?