भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन नियम लागू होणार आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये (cricket)मेरीलेबोन क्रिकेट क्लबने प्रस्तावित केलेले नवीन नियम लागू करत आहे. हे नवीन नियम रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांना लागू होतील. हे नियम प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील दिवसाच्या शेवटच्या षटकातील बदल आणि मुख्य प्रशिक्षकाच्या मैदानावरील प्रवेशाशी संबंधित आहेत. याशिवाय, देशांतर्गत क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजबाबत एक नवीन नियम लागू केला जाईल. वाईड चेंडूंबाबतही नवीन नियम लागू केले जातील.

भारतीय क्रिकेटमध्ये लागू होणारे नवीन नियमनवीन (cricket)नियमांनुसार, आता प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये दिवसाचे शेवटचे षटक पूर्ण करणे अनिवार्य असेल. याचा अर्थ असा की, दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडल्यास खेळ तिथेच थांबणार नाही. नवीन फलंदाजाला दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावे लागेल.एकदिवसीय सामन्यांदरम्यान ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी मुख्य प्रशिक्षकाला मैदानात प्रवेश करण्याची परवानगी असेल.
जर एखाद्या खेळाडूने जाणूनबुजून कमी धावा केल्या, तर क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार पुढील चेंडू कोणता फलंदाज खेळेल हे ठरवू शकेल.
चेंडू डेड घोषित करण्याचा नियमही बदलला आहे. चेंडू डेड मानला जाण्यासाठी (cricket)तो आता गोलंदाज किंवा यष्टीरक्षकाच्या ताब्यात असण्याची गरज नाही. जर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असेल किंवा जमिनीवर पडला असेल, तर तो डेड मानला जाईल.एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये लेग-साइड वाइडसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.चेंडू टाकला जाईल तेव्हा सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आत असणे आवश्यक असेल.
धावताना आपले ग्लोव्हज पुढे ठेवल्याबद्दल (cricket)यष्टीरक्षकांना यापुढे दंड आकारला जाणार नाही.जर एखाद्या गोलंदाजाने जाणूनबुजून नो-बॉल टाकला किंवा तसा प्रयत्न केला, तर त्याला उर्वरित सामन्यासाठी गोलंदाजी करण्यावर बंदी घातली जाईल. तो केवळ डावातच नव्हे, तर संपूर्ण सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाही. अनेक बदलांपैकी एक बदल असा असेल की, जर क्षेत्ररक्षकाने चेंडू स्ट्रायकरपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अडवला, तर तो नो-बॉल किंवा डेड बॉल मानला जाईल.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?