खाऱ्या पाण्याने केस गळतात? करा उपाय?

खाऱ्या पाण्याचा परिणाम केवळ त्वचेवरच नाही तर केसांच्या आरोग्यावरही गंभीरपणे होऊ शकतो. (health) अशा पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास केसांची गुणवत्ता कमी होते, कोंड्याची समस्या वाढते आणि केस गळण्याचे प्रमाणही वाढू शकते. योग्य काळजी घेतल्यास या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आजकाल अनेक शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही खाऱ्या पाण्याची समस्या वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर वापरला जात असला तरी केस धुण्यासाठी बहुतांश ठिकाणी हेच पाणी वापरले जाते. खाऱ्या पाण्यात सोडियम , मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस धुतल्यानंतर टाळूवर खनिजांचा थर तयार होऊ शकतो.

या थरामुळे टाळू कोरडी पडणे, कोंडा वाढणे आणि केस कमकुवत होणे अशा समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ अशीच परिस्थिती राहिल्यास केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात आणि काही प्रकरणांमध्ये टक्कल पडण्याचा धोका वाढू शकतो. (health) त्यामुळे सुरुवातीपासूनच केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक मानले जाते. केस धुण्यासाठी शक्य असल्यास पाणी उकळून पूर्णपणे थंड झाल्यानंतर वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पाण्यामुळे होणारा दुष्परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते आणि केस अधिक मऊ व चमकदार राहतात.

खाऱ्या पाण्यामुळे खराब झालेल्या केसांसाठी दह्याचा हेअर मास्क उपयुक्त ठरू शकतो. आठवड्यातून एक ते दोन वेळा ताज्या दह्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळून तयार केलेला मास्क केस आणि टाळूवर लावावा. हलक्या हाताने मसाज करून सुमारे 45 मिनिटांनंतर साध्या पाण्याने किंवा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. हा मास्क नैसर्गिक मॉइश्चरायझरप्रमाणे काम करून कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकतो.

याशिवाय आठवड्यातून किमान दोन वेळा आवळा, ब्राह्मी किंवा बदाम तेलाने टाळूची मालिश करणे फायदेशीर ठरते. (health) यामुळे कोरडेपणा कमी होऊन केसांना पोषण मिळते. केसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. रोजच्या आहारात अक्रोड, जवस आणि तीळ यांसारख्या सुकामेवा व बियांचा समावेश केल्यास त्यातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांना मुळांपासून मजबूत ठेवण्यास मदत करतात.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?

आग लागली तपासाचा धूर दिसेना?