एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या 16 ऑगस्टपर्यंत एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. (LPG customers) जाणून घ्या ऑनलाईन कशी पूर्ण करणार प्रक्रिया?

एलपीजीचा वापर करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट जाणून घ्या. गॅस सिलेंडरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी आणि सबसिडीसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. येत्या 16 ऑगस्टपॅर्यंत एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबू शकतो. इतकेच नाही तर सबसिडी सुद्धा थांबू शकते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सोपे आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
देशभरातील LPG ग्राहकांचे रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी आणि काळाबाजार थांबण्यासाठी ई-केवायसी मोहिम राबवली जात आहे. (LPG customers) त्यासाठी गॅस एजन्सी ग्राहकांना फोन करुन, एसएमस आणि नोटीस द्वारे याविषयीची माहिती देत आहे. ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. 16 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर फटका बसू शकतो.
अशी करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण
गॅस एजन्सीवर जाऊन पूर्ण करा प्रक्रिया
आधार कार्ड, गॅस कनेक्शन पासबुकसह गॅस एजन्सीवर जा
कर्मचारी आधार क्रमांकाआधारे तुमची माहिती घेईल
फिंगरप्रिट(बायोमॅट्रिक) स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल. (LPG customers) यामुळे तुमचा डेटा अपडेट होईल.
या प्रक्रियेसाठी फार मोठी कसरत करावी लागत नाही.
स्मार्टफोनआधारे घरपोच करा eKYC (Online)
गॅस एजन्सीवर जाऊन रांगेत उभे राहायचे नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करा
सर्वात आधी इंडेन, भारत गॅस वा एचपी गॅसच्या अधिकृत साईटवर अथवा मोबाईल ॲपवर जा
तुमच्या खात्यात लॉग इन करा. ‘eKYC’ वा ‘KYC Update’ हा पर्याय निवडा
LPG ग्राहक क्रमांक, नोंदणीकृती मोबाईल क्रमांक, तुमचे आधार क्रमांकाची नोंदणी करा
यानंतर ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला असेल तो नोंदवा
ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड
गॅस कनेक्शन पासबुक वा LPG ग्राहक क्रमांक
आधारसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक (OTP साठी)
इतर ओळखपत्र आवश्यक आहे
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?