100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेतूनच?

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) काही दिवसांपूर्वी भारतावर मोठा टॅरिफ लावला. त्यांनी लावलेल्या या टॅरिफने मोठी खळबळ उडाली. आता पुन्हा भारतावर टॅरिफचे संकट आहे.

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. अमेरिकेकडून धक्कादायक पाऊले उचलली जात आहेत. भारतासह अन्य काही देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. 100 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावला जाणार आहे. भारतावर अगोदर 200 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला होता. (Donald Trump) त्यानंतर तो टॅरिफ रद्द करण्यात आला. आता अमेरिकेच्या सिनेटने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर एक समान 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध होणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेच्या खासदारांनी या निर्णयाचा विरोधही केला. भारतावर 100 टक्के टॅरिफ लावणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले.

हे एक आत्मघाती पाऊल असल्याचे म्हटले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातूनच भारतावरील टॅरिफकरिता विरोध केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा विरोध वाढताना दिसतोय. सिनेटरकडून यावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलीत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यात 100 टक्के टॅरिफमधून कोणतीही सुटका मिळणार नाही.

हा विधेयक आणताना हा तर्क लावण्यात आला की, या तेल खरेदीमुळे युक्रेन विरोधातील युद्धाला खतपाणी मिळतंय. भारत, चीन, अजरबॅजान, हंगरी, स्लोवाकिया हे देश रशियाकडून तेल खरेदी करणारे मुख्य खरेदीदार आहेत. मतदानानंतर सीनेटर ब्लूमॅंथल यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले की, हे कठोर निर्बंध आणि आयात शुल्क या जीवघेण्या, गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि आक्रमक युद्धात सहभागी असलेल्या सर्वांनाच रोखतील.

काही डेमोक्रॅट्सनी इशारा दिला की, या विधेयकामुळे ट्रम्प यांना आयात शुल्काबाबत नवीन अधिकार मिळतील. हे विधेयक मंजुरीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजकडे जाणार आहे. (Donald Trump) मात्र, तिथे जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. जर भारतावर 100 टक्के टॅरिफ लावला तर भारतालाही हा मोठा झटका असेल. भारतातून अनेक गोष्टी विदेशात निर्यात केल्या जातात. त्या गोष्टींवर मोठा टॅरिफ लागला तर मोठे नुकसान व्यापाऱ्यांचे होऊ शकते.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?