ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मावळ तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या(political updates) सेल अध्यक्ष यांच्यासह अनेक आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीतील(political updates) शिवसेना (उबाठा), कॉंंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी, जिल्हा प्रमुख बाळासाहेब बाल्हेकर, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवा सेना उपप्रमुख दत्ता केदारी, महिला आघाडी प्रमुख शुभांगी कळंगे, महिला आघाडी प्रमुख शीला भोंडवे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर व उपतालुका प्रमुख राम सावंत उपस्थित होते.

यावेळी, ठाकरे गटाचे मदन शेडगे, सोमनाथ कोंडे, रमेश नगरकर, अनंत आद्रे, आनंद जांभळे, हनुमंत ठाकर, श्रीपत तुर्डे, कैलास खरमारे, सुदेश लाड, वैभव हजारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे अध्यक्ष नवनाथ हारपूडे, उपसरपंच ईश्वर वाघोले, संकेत जाधव, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, प्रकाश पठारे, विजय आखाडे, प्रिया पवार, अनिता गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा :

देशभरातील ATM 2-3 दिवस बंद राहणार? 

आईकडे शरीरसुखाची मागणी; रागातून लेकाने डोक्यात दगड घालून केला खून

उर्वरित आयपीएलचे सामने कधी सुरू होणार? बीसीसीआयने सांगितली तारीख