अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार नराधमाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षे ९ महिन्यांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. (disabled girl) याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीला मंगळवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास गावातीलच एका नराधमाने घरी बोलावून घेतले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घृणास्पद प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पीडितेची आई जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती.मात्र, आरोपीने पीडितेच्या आईला शिवीगाळ केली व या प्रकरणाची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. (disabled girl) याप्रकरणी पीडितेच्या आईने मंगळवारी (ता. १३) दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

विहामांडवाला अल्पवयीन मुलीवर अत्याचार विहामांडवा : पैठण तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले. (disabled girl) याप्रकरणी अप्पासाहेब रमेश बोडखे (वय २६) याच्याविरुद्ध पाचोड पोलिसांत ‘पॉक्सो’, ॲट्रॉसिटीसह विविध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. १२ ऑक्टोबर संशयिताने मुलीला घरी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला व वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला असून तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा : 

मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर पण किती दिवसांचा मिळणार

भाजपमध्ये आणखी एक राष्ट्रीय पक्ष विलीन होणार पडद्यामागे घडामोडींना वेग

दसरा की दिवाळी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार