रोहित पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या गुप्त बैठकीवर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

रोहित पवार यांनी नागपूरमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची बातमी आहे. (meeting) त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रोहित पवार यांना हिवाळी अधिवेशन काळात नागपूरमध्ये विधान भवनावर शेतकरी मोर्चा काढायचा आहे. पण त्यावर सुप्रिया सुळे नाराज असल्याच बोललं जातय. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वीच नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. (meeting) यावर आज खासदास सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, “रोहित पवार आणि गुप्त बैठक, म्हणजे काय. रोहित पवार काल नागपूरला गेले होते. त्यांचं लाइव्ह लोकेशन सर्च करा. हे हास्यास्पद आहे. पक्षाची गुप्त बैठक वैगेर हास्यास्पद आहे” अशी सु्प्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया होती.

“मी खरं सांगू का, राज्यासमोर इतक्या मोठ्या दुष्काळाचं सावट आहे, मला या गॉसिपमध्ये फार वेळ मिळत नाही. इतका कामाचा लोड आहे. उद्या शशिकांश शिंदे साहेबांनी राज्याची आढावा बैठक लावली आहे. सगळ्याच जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकारी, नेत्याला शशिंकांत शिंदे साहेबांनी बोलावलं आहे. कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात किती टँकर लावलेत? मोदी सरकारकडून दिल्लीतून पैसे पोचत आहेत का? राज्य सरकारचे पाच हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले का? प्रत्येक तालुक्याचा रिपोर्ट मागितला आहे. तो रिपोर्ट सादर करायचा आहे.दुष्काळाच्या कामाचा इतका व्याप आहे की, फार कमी वेळ मिळतोय” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गोकुळसाठी सरकारने 80 लाख रुपये खर्च केले, न्यायालयीन लढा सुरु आहे. त्यावर सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या. “अंतकरणापासून मी बंटी दादांच्या पाठीशी उभी आहे. बंटी दादा मला भावासारखा आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पण जड अंतकरणाने मला बोलाव लागतय की, कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यानंतर इतर बड्या नेत्यांनी सहकाराची चळवळ जिवंत ठेवली. फक्त एवढीच अपेक्षा होती की, एखाद्या मताने कोणीतरी जिंकला असेल, जो जिता वही सिकंदर पण कोर्टात जाऊन लढाई करण्यापेक्षा सरकारने सामंजस्याने मार्ग काढायला पाहिजे होता” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “आपसात भांडणं करुन प्रश्न सुटणार नाही. आज शेतकरी, दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे. (meeting) यावर चर्चा होणं गरजेचं आहे. सरकारला हातजोडून विनंती आहे की, गोकुळचा प्रश्न मिटवावा देशासमोर आज मोठं आवाहन आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट