पीएम किसानचा लाभ शेतकरी पती-पत्नीला नियम वाचला का

पीएम किसान योजनेचा लाभ शेतकरी पती-पत्नीला मिळतो का? या योजनेत प्रतिवर्षी 6 हजार रुपये निधी देण्यात येतो. (farmer) अशावेळी स्वतंत्रपणे एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती लाभार्थी ठरू शकतात का?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्याला एका वर्षात 6 हजार रुपयांची मदत करण्यात येते. प्रत्येकी तीन हप्त्यात दोन हजार रुपये सन्मान निधी देण्यात येतो. पण एकाच कुटुंबातील पती-पत्नीला स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ मिळू शकतो का? याविषयी अनेकदा संभ्रम पाहायला मिळतो. अनेकांना वाटते असा लाभ घेता येतो. (farmer) तर काही शेतकऱ्यांना याविषयीची कुठलीही माहिती नाही. पण योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकाच पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यात येतो. पती आणि पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे हप्ता देण्यात येत नाही. एकाच व्यक्तीला ही रक्कम देण्यात येते. कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र ठरते.

पीएम किसान योजनेची नियमावली आहे. त्यानुसार, शेतकरी कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो. पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे शेतीची नोंद असली तरी ते एकाच कुटुंबाच्या घटकामध्ये गणले जातात. त्यामुळे कुटुंबातील केवळ एकाच पात्र सदस्याला वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.

जर चुकून एखाद्या कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांनाही वेगवेगळ्या अर्जाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळत असेल तर ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान असे प्रकार समोर येतात. नियमबाह्य जमा झालेली ही रक्कम वसूल करणे अथवा पुढील हप्ता रोखणे यासारखी कारवाई यंत्रणा करू शकते. पण या योजनेतील कडक नियमावलीमुळे असे प्रकार अधिक घडत नाहीत. चुकून काहींनी लाभ घेतला असेल तर नेहमीच्या ईकेवायसी प्रक्रियेने एकाचे नाव योजनेतून बाद करण्यात येते.

योजनेच्या अटींनुसार, कुटुंबातील कोणत्याही सदस्याने एका आर्थिक वर्षात जर आयकर भरला असेल, (farmer) त्याचे निवृत्तीवेतन दरमहा उत्पन्न 10 हजार रुपयांहून अधिक असेल, केंद्र, राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्ती अधिकारी अथवा कर्मचारी असल्यास अशा कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. डॉक्टर, वकील, अभियंता, सीए अथवा व्यवसाय करणाऱ्यांना पीएम किसान योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट