आईकडे शरीरसुखाची मागणी; रागातून लेकाने डोक्यात दगड घालून केला खून

शिवनगर : मजुरी काम करणाऱ्या महिलेकडे(mother) शरीर सुखाची मागणी केल्याचा राग मनात धरून बारामती तालुक्यातील खांडज येथील राऊतवस्ती परिसरातील मारुती साहेबराव रोमन या ५७ वर्षीय पुरुषाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रोमन यांचा मृतदेह हातपाय बांधून तो विहिरीत फेकून देण्यात आला होता, या खुनाचे गूढ माळेगाव पोलिसांनी अवघ्या ५ तासात उलघडून दोन आरोपींना अटक केली आहे.

मारुती साहेबराव रोमन (रा. राऊतवस्ती खांडज ता. बारामती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मजुरी करणाऱ्या नवनाथ शिवाजी घोगरे (रा. कार्ले भाजी लोणावळा ता. मावळ जि. पुणे), अनिल गोविंद जाधव (रा. आंबेवाडी ता. रोहा जि. रायगड) या दोघांना माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील खांडज येथे दिनांक ७ मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कांतीलाल सयाजी माने यांच्या विहिरीमध्ये राऊत वस्ती येथील मारुती साहेबराव रोमन यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर मार लागण्याच्या खुणा होत्या. तसेचं त्याच्या मानेला साडी व दगड बांधलेला होता. यासंदर्भात माळेगाव पोलीस ठाण्यात विजय मारुती रोमन (रा. राऊतवस्ती खांडज) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माळेगावचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे फौजदार अमोल खटावकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी तपासाला सुरुवात देखील केली. परिसरात दाट लोकवस्ती नाही आणि घटनास्थळावर पुरावा नव्हता. माळेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि शोध पथकांना सूचना केली. मारुती रोमन यांचा कोणाशी वाद होता का? याची देखील माहिती घ्यायला सुरुवात केली.

तेव्हा मारुती रोमन हे घटनेपूर्वी काही काळ आधी या परिसरात मजुरी कामासाठी बाहेरून आलेल्या लोकांसोबत फिरताना पाहिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ले, भाजे लोणावळा येथील नवनाथ शिवाजी घोगरे व रायगड जिल्ह्यातील अनिल गोविंद जाधव या दोघांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सुरवातीला रोमन यांना ओळखत नसल्याची आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.

महिला पोलीस पथकाने या दोघांच्या कुटुंबातील महिलांकडे(mother) चौकशी केली, तेव्हा विसंगती आढळून आली आणि काहीतरी माहिती कोणीतरी लपवत आहे असे दिसून आल्याने, पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा मजुरी काम करणाऱ्या मजुराच्या खोपीवर मारुती रोमन हे अधून मधून येत होते आणि एका मजुराच्या आईकडे मारुती रोमन यांनी शरीरसुखाची मागणी केली. त्यावरून संबंधित महिलेने(mother) तिच्या मुलाला सांगितले. त्याचा राग मनात धरून नवनाथ घोगरे याने मारुती रोमन याला विश्वासात घेतले आणि गोड बोलून विहिरीच्या ठिकाणी नेऊन डोक्यात दगड घालून खून केला.

खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मारुती रोमन यांचे कपडे जाळून टाकले आणि परिसरातील उसाच्या शेतात हा मृतदेह लपवून नंतर रात्रीच्या अंधारात साडीच्या साह्याने दोन मोठे दगड बांधले आणि विहीरीत टाकून दिले. त्यावरून पोलिसांनी नवनाथ घोगरे व अनिल बबन जाधव या दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगावचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे फौजदार देविदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सादिक सय्यद, संजय मोहिते, पोलीस हवालदार सादिक सय्यद, राहुल पांढरे विजय वाघमोडे, महिला पोलीस हवालदार रूपाली धिवार, ज्ञानेश्वर सानप, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास राखुंडे, जालिंदर बंडगर, सागर पवार, सुनिता पाटील यांनी केली.

हेही वाचा :

मातृभूमीचं रक्षण करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

देशभरातील ATM 2-3 दिवस बंद राहणार? 

हे देवी आई, आम्हाला काही नको पण पाकिस्तानला नष्ट करून टाक! करोडो भाविकांची साद अन् Video Viral