वीकेंडला फिरायला जाण्यापूर्वी सावधान प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी?

मुसळधार पावसाचा वाढता धोका लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रमुख पर्यटनस्थळे, धबधबे आणि किल्ल्यांवर पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी लागू केली (Ghatmatha) असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या अंदाजामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका, नद्यांमधील वाढती पाण्याची पातळी, धबधब्यांचा वेग आणि दाट धुक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने निर्णय घेत प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत (Ghatmatha) या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.बंद करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भूशी धरण, घुईस धबधबा, ताम्हिणी घाट , भीमाशंकर अभयारण्य, सिंहगड आणि राजगड यांचा समावेश आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर , पाचगणी येथील विविध व्ह्यू पॉइंट्स, कास पठार, ठोसेघर धबधबा, वजराई धबधबा तसेच सज्जनगड परिसरही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

याशिवाय नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, त्र्यंबकेश्वर परिसर, सप्तश्रृंगी गड तसेच भंडारदरा धरण परिसरातील पर्यटनस्थळांवरही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा तसेच घाटमाथ्यातील इतर धबधबे आणि पाण्याच्या ठिकाणांनाही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वन विभागाने नागरिकांना पावसाळ्यात पर्यटनासाठी घाट परिसर, धरणे किंवा धबधब्यांकडे जाण्याचा मोह टाळण्याचे आवाहन केले आहे. अचानक पूर, पाण्याचा वेग वाढणे किंवा दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, (Ghatmatha) त्यामुळे सोशल मीडियासाठी फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?