सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू झाली असून, (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. सुनावणीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक रचनेत करण्यात आलेले बदल, निवडणुका आणि त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली माहिती यावर सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

23 जानेवारी रोजी संघटनात्मक निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. नेते आणि उपनेत्यांची निवड कशा पद्धतीने झाली, (Shiv Sena) याची माहितीही आयोगाला देण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत करण्यात आलेले बदल आयोगाला कळवण्यात आले होते आणि त्याची पोचपावतीही आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.1999 मध्ये अस्तित्वात असलेल्या पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुख हे पदच नव्हते, असा महत्त्वाचा मुद्दाही सिब्बल यांनी मांडला. 23 तारखेला पत्र प्राप्त झाले, 25 तारखेला निवडणूक झाली आणि 27 तारखेला त्याची माहिती आयोगाला देण्यात आली. कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये पक्षातील नेत्यांमध्ये काही बदल करण्यात आले होते का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर आयोगाने याबाबत विचारणा केली असती तर त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली असती, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले. 23 उपनेत्यांची निवड करण्यात आली असून इतर काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.पक्षाच्या घटनेत करण्यात आलेले बदल आणि संघटनेतील संरचनात्मक बदल यांचा परस्पर संबंध नसल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. (Shiv Sena) त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करताना संघटनात्मक बाबींचा विचार कशा पद्धतीने करण्यात आला, यावर या सुनावणीत महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे.
हेही वाचा :
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?