आदित्य ठाकरे ड्रग्सचं सेवन करतात, नितेश राणे यांचा गंभीर आरोप मोठी खळबळ

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर ड्रग्स सेवनाचा गंभीर आरोप केला आहे. दिशा सालियन प्रकरणात नार्कोटिक्स विभागाकडे याबाबत चॅट असल्याचे ते म्हणाले. राणेंनी आदित्य यांच्या आंदोलनावर टीका करत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडल्याचे म्हटले. (allegations) त्यांनी ठाकरेंवर ‘व्होट जिहाद’ला पाठिंबा देत बांगलादेशींना मतदानाचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप केला.

आदित्य ठाकरेंना काल पोलिसांच्या व्हॅनवर उभं राहून ओरडताना पाहिलं. कदाचित काल त्यांनी जास्त जोरात मारलं असेल, म्हणजे ओढलं असेल. दिशा सालियन केसमध्ये नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे आदित्य ठाकरे हे ड्रग्सचे सेवन करतात, असे काही चॅट आहेत. त्याचा इफेक्ट कालच्या आंदोलनात दिसत होता. पोलिसांनी त्यांची ड्रग्स टेस्ट केली असती तर दिसून आलं असतं. काल उगाच पेंग्विन कशाला उड्या मारत होता हेही समजलं असतं, (allegations) असा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून कमी बसा, असा माझा अमित ठाकरेंना सल्ला राहिल. कारण आदित्यच्या संगतीचा असर काल दिसत होता. इफेक्ट दिसत होता. आदित्य ठाकरे काल जास्तच मारून आल्याचं दिसंत होतं, असा दावा नितेश राणे यांनी केला.दोन्ही ठाकरे वाकरे झाले आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात नेहमी कडक भूमिका घेतली. त्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू द्यायचा नाही, अशी भीती निर्माण केली होती. तेव्हाचे बाळासाहेब ठाकरे आणि आताच्या या वाकऱ्यांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे, असं नितेश राणे म्हणाले.

आताचे वाकरे मतदार यादीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची नावे राहावीत, (allegations) त्यांनी आपल्या देशात येऊन मतदान करावं, जेणे करून व्होट जिहाद करून यांचे खासदार निवडून येतील यासाठी झटत आहेत. मोहल्ल्यातून त्यांना 50 ते 70 टक्के मतदान झालं आहे. या वाकऱ्यांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं काही पडलं नाही. ते एवढे त्यांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी बाळासाहेबांचे विचार रसातळाला आणले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकशाहीच्या विरोधात बोलून आणि व्होट जिहादला समर्थन केलं जात होतं. राज्यातील जनता हे सर्व पाहत आहे. एसआयआरवर एवढा आक्षेप होता तर लोकसभेनंतर तुमचे थोबाड का बंद होते? आदित्य ठाकरेंनी वरळीतून राजीनामा द्यायचा होता. दादरचा आमदार महेश सावंतनेही राजीनामा द्यायचा होता. स्वत:चे खासदार मोहल्ल्यातून निवडून येत असताना यांचे थोबाड उघडले नाही? आता मात्र आक्षेप घेत आहेत. विधानसभा आणि बीएमएसीच्या निवडणुकीत यांना लोकांनी नाकारलं. त्यामुळे तुम्ही एसआयआरवर बोट दाखवत असाल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्या. तुमच्या उरलेल्या आमदारांचा राजीनामा घ्या, असं आव्हानच राणे यांनी दिलं.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा