अभिजीत दीपकेंवर भाजप मंत्र्याची टीका राजकीय भूमिकेवर प्रश्न?

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अभिजीत दीपके यांच्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. (Abhijeet Deepak) यापूर्वी जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रिजिजूंनी तरुण नेतृत्व आणि दीपके यांच्या विद्यार्थी म्हणून असलेल्या भूमिकेवर भाष्य केले होते. आता त्यांनी पुन्हा दीपकेंचा उल्लेख करत विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे.

जंतर मंतरवरील आंदोलनातून पुढे येणाऱ्या तरुण नेतृत्वाबाबत किरेन रिजिजूंनी याआधीच प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्रातील रहिवासी असलेले अभिजीत दीपके हे आम आदमी पार्टीशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला होता. (Abhijeet Deepak) त्यावेळी त्यांनी दीपके यांच्या विद्यार्थी म्हणून असलेल्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रिजिजूंनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेल्या दीपकेंचा उल्लेख करत ते आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले होते.

आता पुन्हा बोलताना रिजिजूंनी दीपकेंचा उल्लेख करत, ते महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील व्यक्ती असून आपलाच मुलगा असल्याचे म्हटले. मात्र, तो आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती सर्वांना असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी “तो विद्यार्थी कसा झाला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्याच्या माध्यमातून रिजिजूंनी दीपके यांच्या आंदोलनातील सहभागासोबतच त्यांच्या राजकीय संबंधांवर पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे.

विरोधी पक्षांवर टीका करताना रिजिजूंनी विशेषतः आम आदमी पार्टीला लक्ष्य केले. राजकीय पक्ष निवडणुकीत किंवा राजकीय पातळीवर पराभूत झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावाचा आधार घेऊन राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. (Abhijeet Deepak) अशा प्रकारचे राजकारण लोकशाहीसाठी योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवली होती, तसेच या काळात एकाही व्यक्तीला दुखापत झाली नसल्याचे रिजिजूंनी सांगितले.

दरम्यान, अभिजीत दीपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. गेल्या काही महिन्यांत या पक्षाला सोशल मीडियावर Gen-Z मधील मोठा चाहतावर्ग मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सध्या दीपके ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत आहेत. ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेच्या माध्यमातून ते गावागावात जाऊन सरकारी शाळांमधील समस्या जाणून घेत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून ते शाळांना भेडसावणाऱ्या अडचणी लोकांसमोर आणत आहेत.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?

 सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?

सांगली जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम?