एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तसेच महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत बदल होऊ शकतात, (political) अशाही राजकीय चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, या चर्चांनाही कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अचानक दिल्ली गाठली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारासह विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.या बैठकीला शिवसेना (शिंदे गट) सोबत असलेले काही खासदारही उपस्थित राहू शकतात. (political) त्यामुळे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना (शिंदे गट) समर्थक काही खासदारांचा समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे. याशिवाय, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रीपदासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर, ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नावांचाही संभाव्य दावेदारांमध्ये उल्लेख केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
फडणवीसांबाबतच्या चर्चांनाही उधाण दरम्यान,एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, (political) तसेच महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत बदल होऊ शकतात, अशाही राजकीय चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, या चर्चांनाही कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.काही माध्यमांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबाबतही विविध राजकीय चर्चांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याची किंवा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या सर्वांचे लक्ष अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य बैठकीकडे लागले असून, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?