दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. (murder) न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा, भोंदूबाबा आणि समाजातील बुरसटलेल्या प्रथांविरोधात सातत्याने भूमिका घेतली होती. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर परिसरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ते मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पुणे पोलिसांकडे या हत्येचा तपास होता. (murder) त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2014 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने तपास आपल्या हाती घेतला.

तपास पुढे जात असताना अनेक आरोपींची नावे समोर आली आणि कथित कटाचा तपासही करण्यात आला. 10 मे 2024 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. दुसरीकडे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. CBIने वीरेंद्रसिंह तावडे यांना कथित सूत्रधार म्हणून तपासात मांडले होते; मात्र त्यांच्याविरोधात दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा न्यायालयास आढळला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने आता सचिन अंदुरे याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना त्याला दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करण्याबरोबरच विशेष न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. यापूर्वी या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही एप्रिल 2026 मध्ये उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्यामुळे आता या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.

या निर्णयावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली. हा न्यायालयाचा निर्णय असून त्याची सविस्तर माहिती घेऊन सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. शरद कळसकरला कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्याचेही त्यांनी सांगितले.(murder) त्यामुळे सचिन अंदुरेला मिळालेल्या जामीन आणि शिक्षेला स्थगितीच्या निर्णयानंतर या प्रकरणाचा पुढील कायदेशीर प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?

 सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?

सांगली जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम?