महाराष्ट्रातून येणाऱ्या विनोद तावडेंवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. गमी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. काल भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. आगमी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने आगामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणुका असलेल्या राज्यांची जबाबदारी अनुभवी नेत्यांवर सोपवली आहे. विनोड तावडे यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रभारी बनवण्यात आलं आहे. (responsibility) त्यांच्यासोबत ईश्वरभाई पटेल यांना सह-प्रभारीची जबाबदारी दिली आहे. विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार आहेत. भाजपंसाठी सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा समावेश होतो. अशावेळी विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवणं खूप मोठी बाब आहे.
सतीश पुनिया यांना पंजाब विधानसभा निवडणूक प्रभारी बनवण्यात आलं आहे. पुनिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार आहेत. पंजाबमध्ये पक्षासमोर संघटना मजबूत करणं आणि निवडणुकीसाठी जनाधार वाढवण्याचं आव्हान आहे. तरुण चुग यांना गुजरात विधानसभा निवडणूक प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. चुग राज्यसभा खासदारा आहेत. पक्ष संघटनेत याआधी सुद्धा त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गुजरात भाजपचा मजबूत बालेकिल्ला आहे. (responsibility) आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश भाजपसाठी महत्वाचं आहे.
नितीन नबीन यांनी नव्या कार्यकारिणीत युवा आणि अनुभवी नेत्यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. (responsibility) नव्या टीममध्ये माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय महासचिव बनवण्यात आलं आहे. आरएसएस नेत राम माधव यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे. बीएल संतोष यांना संघटन महामंत्री पदावर कायम ठेवण्यात आलं आहे. मीडियाची जबाबदारी अनिल बलूनी यांच्याकडे असेल. सोशल मीडियाची कमान छत्तीसगडचे नरेश म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आलीय.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?
सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?