घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग, डिलिव्हरी आणि साठवणुकीची धावपळ(gas cylinders) कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील अधिकाधिक घरांमध्ये पाइपद्वारे नैसर्गिक वायू पोहोचवण्याच्या उद्देशाने विशेष प्रोत्साहन योजना मंजूर करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानुसार ही योजना 1 सप्टेंबर 2026 पासून देशभर लागू होणार आहे.

देशातील जास्तीत जास्त कुटुंबांना घरगुती वापरासाठी पाइपद्वारे नैसर्गिक गॅस उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सध्या देशभरात सुमारे 1.74 कोटी घरगुती PNG कनेक्शन कार्यरत आहेत. या संख्येत वेगाने वाढ करून अधिकाधिक घरांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. नव्या योजनेमुळे ज्या भागांमध्ये PNG नेटवर्कचा विस्तार झालेला आहे, तिथे अद्याप सक्रिय न झालेली कनेक्शन्स सुरू करण्यावरही भर दिला जाणार आहे.(gas cylinders) त्याचबरोबर नवीन परिसरांमध्ये पाइपलाइनचे जाळे वाढवण्यास प्रोत्साहन मिळेल. पारंपरिक LPG सिलिंडर आणि अन्य इंधनांच्या तुलनेत PNG अधिक स्वच्छ, सुरक्षित तसेच वापरण्यास सोयीचे मानले जाते.
योजनेत सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना आर्थिक तसेच संसाधनांच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. ज्या घरगुती PNG जोडण्यांचे अद्याप बिलिंग सुरू झालेले नाही, ती कनेक्शन्स सक्रिय करण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल. नवीन भागांमध्ये PNG नेटवर्क उभारण्याच्या प्रक्रियेलाही या योजनेतून चालना मिळणार आहे. ही योजना सहा महिन्यांच्या कालावधीत दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. निश्चित कालावधीत CGD कंपन्यांनी अतिरिक्त बिलिंग सुरू केलेल्या प्रत्येक PNG कनेक्शनमागे त्यांना 200 स्टँडर्ड क्यूबिक मीटर अतिरिक्त स्वस्त देशांतर्गत उत्पादित गॅस दिला जाणार आहे. या अतिरिक्त गॅसचा उपयोग कंपन्यांना CNG वाहतूक क्षेत्रात महागड्या LNG आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी होईल. (gas cylinders) त्यामुळे त्यांचा गॅस खरेदीचा खर्च कमी होण्यास मदत होईल आणि त्याचा परिणाम देशातील PNG नेटवर्कच्या जलद विस्ताराच्या रूपात दिसून येईल.
हेही वाचा :
शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?