भारतातील जुन्या वाहनांना E10 पेट्रोल मिळणार? मोदी सरकारकडून विचार सुरू?

भारतातील जुन्या वाहनांना E10 पेट्रोलही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (E10 petrol) याबाबत मोदी सरकारकडून विचार सुरू आहे.

दिल्ली इथेनॉल मिश्रीत नसलेल्या पेट्रोलची किमंत 167.35 रुपये इतकी झाली आहे. E5 पेट्रोलची किंमत 109.24 रुपये आणि E20 पेट्रोलची किंमत 102.12 रुपये इतकी असणार आहे. तर E10 पेट्रोलची भाव पेट्रोल भाव किती असणार, याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. (E10 petrol) यासोबत जुन्या वाहनधारकांना E10 पेट्रोल देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. देशभरात E20 पेट्रोलमुळे वाहनाच्या मायलेजवर परिणाम आणि इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. दुसरीकडे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केलेल्या एका सूचनेने या चर्चेला नवं वळण लागलं आहे. एका लेखात नागेश्वरन यांनी म्हटलं की, जुन्या वाहनांसाठी पेट्रोल पंपावर E10 इंधनाचा पर्याय सुरू करणे आणि नव्या वाहनांना E20 इंधन सुरू करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

E10 मध्ये 90 टक्के पेट्रोल असते, तर 10 टक्के इथेनॉल असते. तर E20 मध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल असेल. 2025-26 आर्थिक वर्षाच्या सरकारी आकडेवारीनुसार, कच्च्या मालावर अवलंबून इथेनॉलची किंमत अंदाजे 58 रुपये तर 71,86 रुपये प्रति लीटर आहे. ट्रान्सपोटेशन, जीएसटी जोडल्याने इथेनॉलची खरेदी वाढते. (E10 petrol) त्यात दिल्लीत पेट्रोलची आधारभूत किंमत ही 81.12 रुपये इतकी आहे. दिल्लीत व्हॅटशिवाय एक लीटर पेट्रोलची किंमत ही 81.12 आहे. प्रति लीटरमध्ये डीलर कमिशन 4.41 रुपये इतके आहे. तर व्हॅट हे 16.59 व्हॅट जोडल्यानंतर पेट्रोल पंपावर प्रति लिटर 102.12 रुपये इतकी होते.

इथेनॉल मिश्रीत नसलेले पेट्रोल आणि E20 पेट्रोलच्या किंमतीत 65 रुपयांचा फरक आहे. E20 ची जागा E10 ने घेतली. तर पेट्रोलमध्ये 10 टक्के इथनोल मिश्रीत केले जाईल.त्यामुळे E10 पेट्रोल प्रति लिटर 103 रुपये ते 105 रुपये इतके असू शकते. त्यात E10 आणताना अडचणींचाही सामना करावा लागतो. E10 आणि E20 हे दोन्ही प्रकारचे पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र साठवण, वाहतूक आणि वितरण व्यवस्थेची गरज भासते. दरम्यान, इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, XP100 हे दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, जयपूर, चंदीडगड, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू , अहमदाबाद, भुवनेश्वर, कोलकाता या निवडक शहरांतील पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे.

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?