कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
दोन कोटी जनतेच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर पाकिस्तान घायकुतीला आला असून सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती उठवण्याची आणि तसे नाही केले तर कठोर कारवाई करण्याची धमकी पंतप्रधान शाहबाझ शरिफ व त्यांचे सहकारी मंत्री भारताला देऊ लागले आहेत. अर्थात जोपर्यंत भारतातील दहशतवादी कारवाया थांबवल्या जात नाहीत तोपर्यंत पाण्याचा एक थेंबही दिला जाणार नाही अशी कठोर भूमिका भारताने स्पष्ट करून आपल्या औकातीत राहण्याचा सल्ला भारताने दिला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढीस लागला आहे.

अमेरिकेचे भारतातील राजदूत गोर यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन केल्यानंतर हा महत्त्वाचा भूभाग हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे म्हटल्यानंतर पाकिस्तानचा तीळ पापड होणे स्वाभाविकच होते. श्री. गोर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. काश्मीर हा विवादित प्रश्न असून तो दोन्ही देशांनी चर्चेने सोडवायचा आहे अशी भूमिका अमेरिकेची आतापर्यंत राहिली होती आणि आता त्यामध्ये बदल झाला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा उच्चार राजदूतांनी केल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ बनला आहे.पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय दूतवासा परिसरातील काही भाग अतिक्रमित असल्याच्या कारणावरून पाडून टाकला आहे. पाकिस्तानची ही कृती भारतासाठी प्रक्षोभक होती. (agricultural) म्हणून मग त्याला प्रत्युत्तर म्हणून नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरातील पाकिस्तानी दुतावासा परिसरातील अतिक्रमणावर दोनच दिवसापूर्वी हातोडा फिरवला आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप व्यक्तींची त्यांचा धर्म विचारून हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एक वेगळ्या प्रकारचा स्ट्राइक केला.काही कामाच्या निमित्ताने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान काढले. व्यापार व्यवहार थांबवला तसेच सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानचे पाणी तोडले. आणि आता वर्षभरानंतर त्याचे परिणाम पाकिस्तानला दिसू लागले आहेत. हा करार राष्ट्रगीत केल्यामुळे पाकिस्तान मधील सुमारे दोन कोटी लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांची शेती कोरडी पडू लागली आहे. (agricultural) त्याचे गंभीर परिणाम दिसून येऊ लागल्यानंतर पाक पंतप्रधान शरीफ हे चांगलेच भडकले आहेत. सिंधू नदीचे पाणी आमच्यासाठी रेड लाईन आहे. हे पाणी मिळवण्यासाठी आम्ही कोणतेही पाऊल उचलण्यास तयार आहोत अशी प्रक्षोभक भाषा त्यांनी सुरू केली आहे.
पाकिस्तान सरकारने सोशल मीडियाचा वापर भारताविरुद्ध सुरू केला आहे. भारताबरोबरचे प्रत्येक युद्ध आम्ही जिंकले आहे असे वातावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान सरकार तयार करत आहे. भारताविरुद्ध गरळ ओकणारी वक्तव्ये तेथील नागरिकांच्या कडून केली जात आहेत.पाक व्याप्त काश्मीर मध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. 36 मागण्यांचा मसुदा घेऊन तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. त्याचबरोबर 44% भूभाग व्यापलेल्या बलुचिस्तान ने आपण स्वतंत्र झालो आहोत असे दिनांक 11 ऑगस्ट रोजी जाहीर करून पाकिस्तान सरकारची आणि तेथील लष्कराची सर्व प्रकारची कोंडी करून टाकली आहे. एकूणच अंतर्गत परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे आणि त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताविरोधी गरळ ओकण्याचे काम
शरीफ आणि फिल्ड मार्शल मुनीर यांनी सुरू केले आहे.
ज्या ज्या वेळेला पाकिस्तान मधील परिस्थिती अतिशय गंभीर बनते त्या त्या वेळेला पाक राज्यकर्त्यांनी भारताविरोधी प्रक्षोभक वातावरण तयार करण्याचे काम केले आहे. भारताचे सरसेनापती श्री. द्विवेदी यांनी पाकिस्तानला भूगोल वाचवायचा आहे की इतिहासात जायचे म्हणजे इतिहासजमा व्हावयाचे आहे अशा शब्दात दम दिला आहे. (agricultural) त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते चांगलेच बिथरले आहेत. पाकिस्तानी जनतेचे लक्ष बिचलित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून तेथील सोशल मीडियावर पाकिस्तान लष्करी दृष्ट्या किती भक्कम आणि किती मजबूत आहे हे ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा :
शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?