बीसीसीआयचं भ्रष्टाचार विरोधी पथक प्रथमच राज्यस्तरीय टी20 स्पर्धेच्या सामन्यांवर लक्ष ठेवून आहे. खेळाडू आणि संघाचे मालक बुकींसोबत साटंलोटं करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर बीसीसीआयने आता देखरेख ठेवण्यास सुरूवात केली आहे.

बीसीसीआय भ्रष्टाचारविरोधी पथक कामाला लागलं आहे. राज्यस्तरीय टी20 लीग स्पर्धेत कथित प्रकरणं कानावर आल्यानंतर बीसीसीआयने चौकशी सुरू केली आहे. राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग स्पर्धेची चौकशी सुरू करत आहे. खेळाडू, काही संघांचे मालक आणि आयोजक यांच्या संशयास्पद कारभारावर लक्ष ठेवून आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाला बुकी आणि इतर संशयित व्यक्ती खेळाडू आणि संघ मालकांशी संपर्क साधत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकूडन इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. बीसीसीआयकडून राज्यस्तरीय टी20 लीगच्या सर्व सामन्यांवर देखरेख ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. (players and team) यापूर्वी एसीएसयु फक्त कसोटी, आयपीएल आणि इतर प्रमुख सामन्यांवर देखरेख ठेवायचे. राज्यस्तरीय टी20 लीग स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंना अधिक संधी मिळत आहेत आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत. त्यात भ्रष्टाचाराचे संभाव्य मार्गही वाढले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अँटी करप्शन युनिटचे अधिकारी टी20 लीग स्पर्धेत खेळाडू आणि संघाशी निगडीत लोकं हॉटेलमध्ये कोणाला भेटतात, यावर नजर ठेवून आहेत. मागच्या वर्षी तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत काही संघात संशयित हालचालीनंतर अँटी करप्शन युनिटने बारीक नजर ठेवली आहे. रिपोर्टनुसार, ही कारवाई देखील त्याच आधारावर केली जात आहे. (players and team) वृत्तानुसार, अँटी करप्शन युनिटला वाटतं की बुकी, खेळाडू आणि मालकांचं साटेलोटं हे तामिळनाडू प्रीमियर लीगपर्यंत मर्यादीत नाही. इतर देशांतर्गत टी20 लीग स्पर्धेत हे जाळं पसरल्याचा संशय आहे.
देशांतर्गत जून ऑगस्ट दरम्यान मुंबई, सौराष्ट्र, बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडमध्ये टी20 लीग स्पर्धा होतात. या दरम्यान बुकी, खेळाड आणि मालकांदरम्यान काही संशयित हालचाली होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, (players and team) काही नियम तोडण्याबाबत काही जणं एसीएसयुच्या रडारवर आहेत. भारतातील वाढत्या राज्यस्तरीय टी20 लीग स्पर्धांकडे बुकींची वाकडी नजर पडल्याचं दिसत आहे. आता बीसीसीआयने संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली असून वेळीच त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. यात दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?