उत्तर प्रदेशातील रामपूरमधील अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील करणपूर गावात एका वडिलांनी अमानुष कृत्य केले आणि आठ महिन्यांच्या निष्पाप मुलाला(baby) उलटे लटकवून गावात फिरले. पत्नीशी झालेल्या वादानंतर आठ महिन्याच्या मुलाला गावभर फिरवलं. या हृदयद्रावक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अझीमनगर पोलीस स्टेशनच्या करणपूर गावात राहणारा संजू याचा पत्नी सुमनशी वाद सुरू होता. सुमनचा भाऊ शिवचरण याने सांगितले की, त्याची बहीण सुमनचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी संजूशी झाला होता. लग्न झाल्यापासून तो हुंड्यासाठी सुमनचा छळ करायचा. काही दिवसांपूर्वी मारहाण करून सासरच्या घरातून हाकलून लावल्यानंतर, सुमन पंचायतीमार्फत तिच्या सासरच्या घरी परतली होती.
शिवचरण यांच्या म्हणण्यानुसार, १९ जुलै रोजी संजूने पुन्हा आपल्या पत्नीला मारहाण केली. सुमनने तिच्या पालकांना फोन करून माहिती दिली तेव्हा संजू संतापला आणि त्याने सुमनला घराबाहेर ढकलले. यानंतर त्याने त्याच्या आठ महिन्यांच्या मुलाला(baby) उलटे लटकवले आणि हवेत हलवत गावात फिरवले. यादरम्यान, मुलगा सतत रडत राहिला आणि गावकरी बघतच राहिले, त्याला थांबवण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
गावात सुमारे अर्धा तास हे अमानुष दृश्य सुरू राहिले. नंतर संजूच्या कुटुंबीयांनी कसे तरी मुलाला त्याच्यापासून हिसकावून घेतले. दरम्यान, महिलेचा भाऊही गावात पोहोचला आणि तो त्याच्या बहिणी आणि निष्पाप मुलाला घेऊन मिल्कखानम पोलीस स्टेशन परिसरातील शादीनगर हाजिरा गावात गेला.

संजूने त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप केला. माहिती मिळताच आरोपी संजूही तिथे पोहोचला आणि गोंधळ घालू लागला. मिल्कखानम पोलीस स्टेशनच्या प्रभारी निशा खटाना यांच्या म्हणण्यानुसार, संजूने पोलीस स्टेशन गाठले आणि त्याच्या सासरच्यांवर मारहाणीचा आरोप केला, परंतु जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर आले. पोलिसांनी त्याला २२ जुलै रोजी अटक केली आणि शांतता भंग करण्याच्या कलमाखाली एसडीएम कोर्टात पाठवले, जिथून त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, असे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींवर कठोर कलमांतर्गत कारवाई का केली गेली नाही हा प्रश्न आहे. ग्रामस्थ आणि महिला पक्षाने आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा :
एका चुकीमुळे 4 वर्षीय मुलीचा आईच्या डोळ्यादेखत 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू
मोठी बातमी! नाराजी भोवणार, बडा नेता भाजपच्या गळाला? काँग्रेसला बसणार मोठा धक्का?