लहान मुलं आजूबाजूला असताना फार काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जातं. लहान मुलांना संभाळणं हे फार कठीण काम आहे. मुलांवरील नजर वळली की ते काय करतील सांगता येत नाही. मुलांकडे केलेलं दुर्लक्ष कधीकधी त्यांच्या जीवावर बेतू शकतं. असाच एक धक्कादायक प्रकार वसईमध्ये घडला आहे. आईने केलेल्या एका छोट्याश्या चुकीमुळे एका चिमुकलीचा 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू(death) झाला आहे. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. काळजाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

वसई पूर्वेतील नवकार सोसायटीतील इमारतीमध्ये ही विचित्र दुर्घटना घडली. या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू(death) झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. दोन दिवसांनंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पालकांची नजर जरा इकडे तिकडे वळाली तरी क्षणभरात होत्याचं नव्हतं होतं, हे या व्हिडीओमधून दिसत आहे. मयत चिमुकलीचं नाव अन्विका प्रजापती असं आहे.
चार वर्षाची अन्विका तिच्या आईसोबत घराबाहेर जात होती. अन्विका आईसोबत घराबाहेर जात असताना तिला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवले. लाकडी स्टॅण्ड लॉबीजवळच्या खिडकीला लागून होते. मुलीला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टॅण्डवर बसवल्यानंतर चप्पल घालण्यासाठी तिची आई दुसऱ्या बाजूला वळाली. इतक्या अन्विका तेथील खिडकीवरील कठड्यावर बसण्यासाठी गेली.
मात्र अचानक अन्विकाचा तोल गेला. या खिडकीची काच लावलेली नसल्याने आणि खिडकीला कोणतंही सुरक्षा जाळी नसल्याने काही समजण्याच्या आत चार वर्षांची चिमुकली खिडकीतून खाली पडली. खाली कोणताही स्लॅब किंवा इतर काहीही अडथळा नसल्याने अन्विका थेट 12 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. सदर दृश्य ही कोणालाही विचलित करतील अशीच आहेत.
महाराष्ट्र : वसई में दर्दनाक हादसा
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) July 25, 2025
मां ने 4 साल की बच्ची को खिड़की पर बैठाया… संतुलन बिगड़ा और बच्ची 12वीं मंज़िल से गिर गई। मौके पर ही मौत।
पूरी घटना सीसीटीवी में कैद, वीडियो देख दहल उठे लोग।#Vasai #Maharashtra #ChildSafety #CCTV #BreakingNews pic.twitter.com/TgnQfOV4ZT
सीसीटीव्हीमधील हा धक्कादायक प्रकार पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. या दुर्घटनेमधून लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल पालकांनी अधिक जागृक राहण्याची गरज असल्याचं अधोरेखित होत आहे. तसेच लहान मुलं वावरत असलेल्या इमारती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेसंदर्भातील सर्व उपाययोजना केलेल्या आहेत की नाही हे पाहणंही या साऱ्या प्रकारेमुळे चर्चेत आलं असून पालकांनी सजग राहणं किती महत्त्वाचं आहे हे दिसून येत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! नाराजी भोवणार, बडा नेता भाजपच्या गळाला? काँग्रेसला बसणार मोठा धक्का?
बिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट
Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, आता मिळवा 601 रुपयांमध्ये वर्षभर अनलिमिटेड डेटा