दारू पिऊन नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण; छतावरून उलटे लटकावले अन् हादरवणारा Video Viral

सोशल मीडियावर नेहमीच अनेक धक्कादायक प्रकार व्हायरल होत असतात. बऱ्याचदा यातील दृश्ये इतके थरारक असतात की त्यांना पाहताच आपल्या अंगावर काटा येतो. आताही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यातील पतीच्या(husband) कृत्याने सर्वच हादरून गेले आहेत.

घटना बरेलीतील आमला येथील असून यात एका पतीने मद्यधुंद अवस्थेत आपली मर्यादा ओलांडली आणि पत्नीला बेदम मारहाण केली. मुख्य म्हणजे त्याची क्रूरता इथेच संपली नाही तर यानंतर त्याने आपल्या पत्नीला घराच्या छतावरून उलटे लटकावले. नवऱ्याचेहे भीषण कृत्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून लोक आता यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

पतीने प्रथम क्रूरपणे पत्नीला मारहाण केली आणि मग तिला छताला लटकावले. पत्नीचा आवाज ऐकताच आजूबाजूची लोक घटनास्थळी पोहचली. यादरम्यान पतीने(husband) आपल्या पत्नीला छतावरून निर्दयपणे सोडले पण लोकांनी वेळीच महिलेले पकडले ज्यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचला. माहितीनुसार, मारहाणीमुळे महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. पीडित महिलेच्या भावाने तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपी घरातून पळून गेला आहे.

या घटनेदरम्यान, एका शेजाऱ्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी तिच्या पत्नीला छतावरून उलटे लटकवून खाली फेकण्याचा प्रयत्न करत आहे. पत्नी जोरजोरात ओरडत आहे. परिसरातील लोकांनी सांगितले की, जर वेळेवर मदत मिळाली नसती तर महिलेला आपला जीव गमवावा लागला असता.

सोशल मीडियावर अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे जे चिंतेचे कारण बनत चालले आहे. महिला सुरक्षेसाठी देशात अनेक नियम आणि कायदे बनवण्यात आले आहेत मात्र तरीही देशात आजही महिला सुरक्षित नाहीत याची पोचपावती या घटनेतून पाहायला मिळते. दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @sirajnoorani नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

“गोकुळ” च्या सत्ता संघर्षात सी.एम., डी.सी.एम. उतरले

आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार…

तुम्हीदेखील एसटीतून प्रवास करताय? तर तुमच्यासाठी ‘ही’ आनंदाची बातमी; एसटीतच आता…