आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार…

आयपीएल(IPL) 2025 चा थरार आजपासून पुन्हा सुरू होत आहे. लीगच्या 58व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना आज बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी खेळवला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

RCB आणि KKR दोघांसाठीही हा सामना(IPL) अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. RCB प्लेऑफच्या उंबरठ्यावर असून त्यांना केवळ एका विजयाची गरज आहे. दुसरीकडे, KKR च्या प्लेऑफ आशा अजूनही जिवंत आहेत, मात्र पराभव झाल्यास त्यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

पावसामुळे सामन्यावर संकट? :
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बेंगळुरूमध्ये आज संध्याकाळी पावसाची शक्यता आहे.

संध्याकाळी ७ वाजता – पावसाची शक्यता ३४%

रात्री ९ वाजता – शक्यता ४०%

रात्री १० वाजता – शक्यता वाढून ५१%

रात्री ११ वाजता – शक्यता ४७%

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे DLS नियम लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही, चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज सिस्टीम अत्यंत उत्कृष्ट असल्यामुळे जर पावसाचा जोर कमी असेल, तर पूर्ण सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.

IPL मध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ३५ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी RCB ने १५, तर KKR ने २० सामने जिंकले आहेत. याआधीच्या हंगामात RCB ने KKR ला ७ विकेट्सने हरवलं होतं. RCB सध्या ११ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांवर आहे. त्यामुळे एक विजय मिळाल्यास RCB प्लेऑफमध्ये थेट प्रवेश मिळवू शकतो. त्यामुळे आज KKR साठी मात्र आजचा सामना “करो या मरो”सारखा असणार आहे.

पावसामुळे सामना संपूर्ण होईल की नाही याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. यामध्ये विराट कोहली, फाफ डुप्लेसी, सुनील नारायण, आंद्रे रसेल यांसारखे स्टार्स मैदानात उतरणार असल्यामुळे सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

हेही वाचा :

जिओची धमाका ऑफर! फक्त 100 रुपयांच्या रिचार्जमध्ये 299 रुपयांचे फायदे अन्

कोल्हापुरात एमबीए तरुणाचं टोकाचं पाऊल, चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर

खराब भिंतींना ‘गुडबाय’! ‘या’ सोप्या उपायांनी घर होईल नव्यासारखं!