जिओची धमाका ऑफर! फक्त 100 रुपयांच्या रिचार्जमध्ये 299 रुपयांचे फायदे अन्

देशातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड Reliance Jio ने OTT प्रेमींसाठी जबरदस्त ऑफर(recharge) आणली आहे. केवळ 100 रुपयांमध्ये Jio वापरकर्त्यांना मिळणार आहे 299 रुपयांचे फायदे – म्हणजेच JioCinema Premium सबस्क्रिप्शन आणि 5GB डेटा, तेही तब्बल 90 दिवसांसाठी!

काय मिळणार या 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये?

  • डेटा: 5GB
  • OTT: JioCinema Premium मोफत (मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर)
  • वैधता: 90 दिवस
  • किंमत: फक्त ₹100
  • खरे फायदे: ₹299 इतक्या किमतीचे

यापूर्वी JioCinema Premium सबस्क्रिप्शनसाठी किमान ₹299 चा प्लॅन(recharge) आवश्यक होता. पण आता तोच प्रीमियम कंटेंट आणि अनुभव मिळणार आहे केवळ ₹100 मध्ये, कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता!

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

  • हा बेस प्लॅन नाही, तर एक अ‍ॅड-ऑन / बूस्टर प्लॅन आहे.
  • सिम सुरू ठेवण्यासाठी वेगळा अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅन आवश्यक आहे.
  • फक्त OTT वापरासाठी हाच एक किफायतशीर पर्याय.

कोणासाठी उपयुक्त?

जर तुम्ही Jio ग्राहक असाल आणि दर्जेदार वेब सिरीज, सिनेमे, आणि लाईव्ह स्पोर्ट्स स्वस्तात पाहू इच्छित असाल, तर हा प्लॅन खास तुमच्यासाठीच आहे. 90 दिवसांच्या JioCinema Premium सह तुमचं मनोरंजन आता अर्ध्या किंमतीत!

हेही वाचा :

लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही! एकनाथ शिंदे प्रचंड संतापले

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष…”; ‘गोकुळ’बाबत काय म्हणाले सतेज पाटील?

खराब भिंतींना ‘गुडबाय’! ‘या’ सोप्या उपायांनी घर होईल नव्यासारखं!