ठाणे: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे(political news) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भारतीय जनता पक्षानं आक्रमक राजकारण सुरु केलं आहे. ठाणे महापालिकेत ओन्ली कमळ म्हणत वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक कामाला लागले आहेत. त्यामुळे ठाण्यावरील वर्चस्वावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे विरुद्ध नाईक यांच्यातील विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे. दोघांमधील शीतयुद्धात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे.

भाजपचे गणेश नाईक महायुती सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. ठाण्यात ते सातत्यानं जनता दरबार घेत असतात. ठाणे महापालिकेसाठी त्यांनी ओन्ली कमळ अशी घोषणा देणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही. या दोघांमध्ये असलेला संघर्ष आता त्यांच्या खात्यांपर्यंतही पोहोचला आहे. मान्सूनआधी प्रशासकीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी झालेल्या बैठकीत याची प्रचिती आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political news) यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्ता सातत्यानं चर्चेत असतो. या रस्त्याची अवस्था बिकट आहे. बैठकीत या रस्त्याचा विषय निघाला. या रस्त्याची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली. डांबरी रस्ता तयार करण्यात आला. त्यावरुन रस्ता सिमेंट काँक्रिटचा न करता डांबराचा का केला, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला परवानगी न दिल्यानं डांबराचा रस्ता करावा लागला, असं उत्तर शिंदेंकडे(political news) असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं. त्यावरुन शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना परवानगीबद्दल विचारलं. त्यावर वन क्षेत्रात सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधता येत नाही. त्यासाठी परवानगी देता येत नाही, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंदेंना सांगितलं.

यावरुन शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. गायमुख भागात सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी ताबडतोड परवानगी द्या. अन्यथा गुन्हे दाखल करु, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी शिंदे बरेच संतापलेले दिसले. ‘लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब सांगा. घोडबंदर रोडवर सिमेंटचा रस्ता बांधण्यास परवानगी द्या. अन्यथा अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही, या गैरसमजात राहू नका, अशा शब्दांत शिंदेंनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
हेही वाचा :
गौतम अदानी यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी तुर्की आणि चीनचा करेक्ट कार्यक्रम
शाहांना ईडीचा बांबू लावला तर, शिवसेनेत येतील; संजय राऊतांनी सांगितली भाजपची स्ट्रॅटेजी
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष…”; ‘गोकुळ’बाबत काय म्हणाले सतेज पाटील?