हिंगोली : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये(ST) एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर महिला व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नी ऐरणीवर आला. यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित होणार आहे.

भविष्यात एसटीच्या(ST) प्रवाशांना सुरक्षित प्रवासासह वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत. एसटी प्रशासनाने नव्या 3 हजार बसेसची खरेदी केली आहे. तसेच बस बांधणी कंपन्यांची नुकतीच बैठकही घेण्यात आली.
नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एल.ई.डी, टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अॅनालाईज यंत्रणा, याबरोबरच चोरी-प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस-लॉक सिस्टिम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार आहे. या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी राहणार आहेत.
स्वारगेट बसस्थानकावरील(ST) घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे.
नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातीबरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडींबाबत अपडेट राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूस देखील जाहिरात प्रसिद्धीकरता एलईडी पॅनल लावण्यात येणार आहे. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे.
सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार आहे. बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तात्काळ शमवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.
हेही वाचा :
“गोकुळ” च्या सत्ता संघर्षात सी.एम., डी.सी.एम. उतरले
आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार…
जिओची धमाका ऑफर! फक्त 100 रुपयांच्या रिचार्जमध्ये 299 रुपयांचे फायदे अन्