महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सामाजिक न्याय विभागाकडील ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. (Maharashtra) यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. निधी वर्ग झाल्यानंतर आता हप्ता वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
सामाजिक न्याय विभागाची तरतूद महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने हप्ता वितरणासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित विभागांकडून DBT प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे १ कोटी ६५ लाख पात्र महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra) दरम्यान, कागदपत्रांची पूर्तता न करणे किंवा योजनेच्या पात्रता निकषांमध्ये न बसणे यामुळे जवळपास ९० लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या तरतुदींमधून निधी वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या विभागांच्या इतर कल्याणकारी योजनांच्या निधीवर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. (Maharashtra) यापूर्वीच्या निधी वर्गीकरणाचा आढावा घेतल्यास, फेब्रुवारी २०२६ मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, तर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांसाठी प्रत्येकी ४१०.३० कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. तसेच जून २०२५ मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्यासाठी ४१० कोटी रुपये देण्यात आले होते. वारंवार निधी वळविण्याच्या निर्णयामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या अन्य योजनांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता वेळेत मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला?
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये?