रूपाली चाकणकर मोठ्या वादात सापडल्या आहेत. पुण्यात सुरू केलेल्या हॉटेलमुळे त्या तूफान चर्चेत आहेत. त्यातच संगीता तिवारी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव पुढे आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संगीता तिवारी यांनी म्हटले की, सहा महिन्यानंतर समजलं का लज्जा उत्पन्न झाली. सहा महिने लज्जा नव्हती का? माणसाने किती निर्लज्ज असावं. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी अवस्था रूपाली चाकणकरांची झाली आहे. स्वतःचं कमबॅक करण्यासाठी एका नेत्याने सांगितलं, त्यासाठी तुम्ही बाकीच्या लोकांना त्रास देत आहेत. गुन्हा दाखल होऊ शकत नाही. सोशल मीडियावरील पोस्ट पहा किती घाण कमेंट्स केलेले आहेत, (Rupali Chakankar) मग त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा. तुम्ही गुन्हेगार नव्हत्या तर तुमचा राजीनामा का घेतला?. तुम्ही गुन्हेगार होता म्हणून राजीनामा दिला. ही बाई अतिशय खोटारडी आहे.
पुढे संगीत तिवारी यांनी म्हटले की, 2012 प्रतिज्ञापत्र पाहिलं तर आणि आजच्या दिवशी साठ कोटींचं पब, डान्स बार ,रेस्टॉरंट. माहिती अधिकारात आम्ही माहिती घेतोय हा पब आहे डान्सबार आहे का बार? आधी नाशिकमध्ये बायकांच वाटोळ केलं, पुणे सांस्कृतिक शहर आहे, (Rupali Chakankar) आता आमच्या मुलांचं वाटोळ करणार का? तिथं तुम्ही दारू देणार हुक्का देणार पोरी देणार. तुमचा पार्टनर कोण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून हाकलून दिलेला महेश शेट्टी याला तुम्ही पुण्यात प्रवेश देणार. हॉटेलला अंडरवर्ल्डचा मुजावर हा सुरक्षा देणार. एकंदरीत पहिल्यांदा महिला टार्गेट केल्या, त्यांचं वाटोळं केलं त्या महिलांवर तुम्ही पैसे कमावले ते हॉटेलमध्ये लावताय का? पुण्याची संस्कृती आणि मुलांना खराब करायचा कार्यक्रम ठेवला आहे का हा माझा सवाल.
सर्वात महत्त्वाचं एवढे 60 ते 70 कोटी आले कुठून आम्ही त्यांचा प्रवास. माहितीच्या अधिकारात आम्ही महसूल पोलीस प्रशासनाकडून माहिती घेणार. रूपाली चाकणकरांना जागा देणारा भाजपचा माणूस आहे. पैसे कमवण्यासाठी तुम्ही पुण्याचं वाटोळ करायला निघालात का. कल्याणी नगर सारख्या भागात 20 हजार चौरस फूट एवढं मोठं हॉटेल बांधलं तुम्ही अचमबीत व्हाल. जरी भाजपच्या माजी आमदाराच्या भावाने ही जागा त्यांना भाडेतत्त्वावर दिली असली तरी कुठेतरी पार्टनर इन क्राईम आहेस ना.उद्घाटनासाठी जयंत पाटील येतात (Rupali Chakankar) ज्यांनी घरातला पाणी दिलं होतं, ते रूपाली चाकणकरांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी येतात आणखी बरेच जण आहेत. ह्या नेत्यांच्या बायकांना कळत नाही का ही बाई अशी आहे तुम्ही का गेलात उद्घाटनासाठी विचारलं पाहिजे बायकांनी चाकणकर बाईंना पैशाचा खूप माज आला आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?