कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अल निनो चा प्रभाव वाढण्यासाठी पर्यावरणीय प्रतिकूल स्थिती कारण भूत ठरत असते. पर्यावरणीय संतुलन बिघडते ते प्रामुख्याने झाडांच्या कत्तलीमुळे. उत्तम पर्यावरणासाठी एकूण क्षेत्रफळाच्या 33 टक्के भूभाग हा जंगलाने अच्छादित असणे गरजेचे आहे पण महाराष्ट्रात सध्या जंगल क्षेत्र घटले आहे आणि त्याबद्दल स्वर्गीय मोहन धारिया यांच्या वनराई संस्थेच्या वतीने वेळोवेळी चिंता व्यक्त करून जंगलाचा ऱ्हास थांबवा असे केंद्र आणि राज्य शासनाला वारंवार आवाहन केले होते. (ecological) आता त्यांची जागा अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. या एकूण पार्श्वभूमीवर भीमाशंकर कर्जत परिसरात होणार असलेल्या एका जलविद्युत प्रकल्पामुळे एक जंगलच कापून काढले जाणार आहे. तरी नाही मी भूमिपुत्रांसह विरोधी पक्षीय नेत्यांनी या प्रकल्प विरोधी रान उठवायला सुरुवात केली आहे. विकास प्रकल्प झाले पाहिजेत पण त्यासाठी जंगल क्षेत्र भकास होता कामा नये याकडे लक्ष दिले पाहिजे.

सध्या महाराष्ट्र तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. जवळपास 85% महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. आणि त्याला अल निनो चा वाढलेला प्रभाव कारणीभूत ठरला आहे. आणि 2027 च्या मार्च महिन्यापर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. हे सर्व घडते आहे ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे. (ecological) जगातील काही प्रमुख प्रगतशील राष्ट्रे ग्लोबल वार्मिंग ला कारणीभूत ठरलेली आहेत.भारतही त्याला अपवाद नाही.रायगड जिल्ह्यातील भीमाशंकर कर्जत परिसर हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जैवविविधता तसेच पशुपक्षी आणि जलस्रोत या परिसरात आहेत. वन्य जीवांचा अधिवास याच परिसरात आहे.
तीन हजार मेगावॉट वीज निर्मिती करणारा जलविद्युत प्रकल्प तिथे उभारला जाणार आहे. सुमारे 15000 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला साधारणतः सहाशे एकर पेक्षा अधिक जमीन क्षेत्र लागणार आहे. केंद्रीय वन विभागाने भीमाशंकर कर्जत परिसरातील वनक्षेत्र
या प्रकल्पासाठी देऊ केले आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. गुजरातच्या टोरंट पॉवर ही कंपनी हा प्रकल्प उभा करणार आहे.या प्रकल्पासाठी 32 हजार पेक्षाही अधिक झाडांची कत्तल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे एक घनदाट जंगलच या प्रकल्पासाठी कापून काढले जाणार आहे. आणि म्हणूनच तेथील भूमिपुत्रांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे आणि तो योग्यच आहे. आता राज ठाकरे हे कर्जतला जाणार आहेत. राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकल्पाला प्रखर विरोध केला आहे.
कोणत्याही प्रकल्पासाठी जेव्हा झाडांची कत्तल केली जाते तेव्हा संबंधित कंत्राटदार कंपनीला एक झाड तोडले तर दहा झाडे लावण्याची अट घातली जाते. प्रत्यक्षात तितकी झाडे लावली आहेत किंवा नाहीत याची पाहणी करण्याची कोणतीही यंत्रणा उभा करण्यात आलेली नसते किंवा (ecological) अशी काही यंत्रणा असली तरी ती कंत्राटदाराला हवा तसा अहवाल देत असते. कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली आहेत आणि आता ते चांगली वाढलेली आहेत असे चित्र कुठेही दिसत नाही.टोरंट पॉवर कंपनीकडून बत्तीस हजार पेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जाणार असून तिथे किमान 64 हजार वृक्ष लागवड केली जाईल असे राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पण त्यावर भूमिपुत्रांनी विश्वास ठेवावा असे वातावरण शासनाकडूनच तयार केले गेलेले नाही. हा जलविद्युत प्रकल्प 600 एकर जमिनीवर उभारला जाणार असला तरी त्याचे प्रतिकूल परिणाम उर्वरित जंगल क्षेत्रावर होणार आहे. तेथील जैवविविधता धोक्यात येणार आहे. आणि म्हणूनच जंगलांचा नाश करणारे विकास प्रकल्प नकोत.
टोरंट पॉवर ही कंपनी गुजरातची आहे हा एक योगायोग असावा. गुजरातची कंपनी म्हणून प्रकल्पाला विरोध अशी भूमिका विरोधकांनी घेतली नाही पाहिजे. उलट या प्रकल्पामुळे पर्यावरणीय हानी किती मोठ्या प्रमाणावर होणार आहे हे त्यांनी या क्षेत्रातील तज्ञ लोकांचा हवाला देऊन सांगितले पाहिजे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने तेथील झाडांची कत्तल थांबवण्यासाठी जसे आंदोलन उभा केले होते असे आंदोलन इथेही उभा केले पाहिजे.
हेही वाचा :
दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार
आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव
आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा